Join us
Daily Top 2Weekly Top 5

"३१ डिसेंबरला मी पार्टी देणार आहे!"; प्रसाद ओकची मोठी घोषणा, थेट पत्ताही दिला, बघा व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2025 15:58 IST

प्रसाद ओक पार्टी कधी देणार? असा प्रश्न हास्यजत्रामध्ये विचारला जातो. अखेर प्रसादने याविषयी खुलासा केला आहे

प्रसाद ओक हा मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेता. प्रसाद ओकला आपण विविध सिनेमांमध्ये अभिनय करताना बघितलंय. प्रसाद ओक सध्या 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' शोमध्ये परीक्षकाच्या खुर्चीत पाहतो. 'हास्यजत्रा'मध्ये प्रसाद ओकने आजवर कधीच पार्टी दिली नाही, या गोष्टीमुळे त्याच्यावर विनोद होतात. पण आता प्रसादने सोशल मीडियाच्य़ा माध्यमातून पार्टी देणार असल्याची घोषणा केली आहे. काय म्हणाला प्रसाद?

अखेर प्रसाद ओक पार्टी देणार...

प्रसाद ओकने सोशल मीडियावर त्याचा बॅकग्राऊंड असलेला एक रिल शेअर केला आहे. यात प्रसाद म्हणतो, ''३१ डिसेंबरला मी पार्टी देणार आहे. पत्ता पुढीलप्रमाणे...''. पुढे व्हिडीओत एक न्यूज अँकर दिसतो. तो काय बोलतो हे अजिबात कळत नाही. शेवटी ''नक्की या, वाट बघतोय'' असं म्हणत प्रसाद हसण्याचे इमोजी शेअर करतो. प्रसादचा हा मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. प्रसादच्या विनोदबुद्धीचं यामुळे कौतुक होतंय.

प्रसादचा हा व्हिडीओ समोर येताच चाहत्यांनी त्याच्यावर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. ''साहेब आलो असतो पण एकादशी आहे'','' ३१ डिसेंबर आहे की १ एप्रिल'', ''मला कळलं आहे... खारघरला आहे, ''उपवासाची खिचडी आणि फराळी मिसळ मेनू असेल'', ''सर तुमचं घर माहित आहे मला, मी येतो तिकडे, तिथून पुढे सोबत जाऊ आपण'', अशा मजेशीर कमेंट करत लोकांनी प्रसाद ओकच्या व्हिडीओला पसंती दिली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Prasad Oak announces a New Year's Eve party with a twist!

Web Summary : Actor Prasad Oak playfully announced a New Year's Eve party via social media. Known for his humor on 'Maharashtrachi Hasyajatra,' Oak's video cleverly teases the party's address, leaving fans amused and guessing.
टॅग्स :प्रसाद ओक बॉलिवूडटेलिव्हिजनटिव्ही कलाकार