Cannes 2026: फ्रान्समध्ये सुरू असलेल्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळीनेही हजेरी लावली होती. प्राजक्ताने नऊवारी साडीत पारंपरिक साज करत मराठमोळा ठसका दाखवला. नाकात नथ, कपाळी चंद्रकोर, पायात पैंजण असा अस्सल पारंपरिक लूक प्राजक्ताने केला होता. या सगळ्यात लक्ष वेधून घेतलं ते प्राजक्ताच्या दागिन्यांनी. प्राजक्ताने घातलेल्या दागिन्यांतून मराठी संस्कृतीतील पारंपरिक अलंकारिक दागिन्यांची झलक पाहायला मिळाली. याबाबत प्राजक्ताने पोस्ट शेअर केली आहे.
कान्समध्ये प्राजक्ता ११५ वर्ष जुनी नथ आणि १२५ वर्ष जुना तन्मणी घालून मिरवली. हे दागिने तिला अकलूजच्या सावंत घराण्याने कान्समध्ये घालण्यासाठी दिले होते. प्राजक्ताने कान्समधील आणखी काही फोटो पोस्ट केले आहेत. ती म्हणते, "क्लोज अप तर post करावे लागतीलच ना…प्राजक्तसाजचे अलंकार आहेत. अर्थात “अकलूजच्या सावंत राजघराण्याचे” आभार की त्यांनी त्यांची ११५ वर्ष जुनी नथ आणि १२५ वर्षाहून अधिक जुना तन्मणी ह्या कार्यक्रमासाठी दिला. परिधान केलेले अलंकार- गळ्यात - सुवर्ण चंद्र ठुशी. कानात- फुलवंती बुगडी, कर्णफुल झुबे, वेल. हातात- पिछोडी, नमस्कार तोडे, शिंदेशाही तोडे ; चटईवीण बाजूबंद. पायात- गजरी पैंजण. तन्मणी - छल्ला म्हणून परिधान केलाय".
प्राजक्ता माळीसोबत कान्स फेस्टिव्हलमध्ये अशोक सराफ, निवेदिता सराफ, अंकिता वालावलकर यांनीही हजेरी लावली. अभिजात मराठी ओटीटी या प्लॅटफॉर्मचं जागतिक लाँच करण्यासाठी हे कलाकार कान्समध्ये गेले होते. कान्समधील त्यांचे फोटो आणि रेड कार्पेटवरील व्हिडीओ व्हायरल झाले आहेत.
Web Summary : Prajakta Mali showcased Marathi heritage at Cannes, wearing a traditional 'Nath' and antique jewelry from the Savant family of Akluj. She posted photos expressing gratitude for the opportunity to represent Marathi culture on a global platform. Ashok Saraf and others also attended the festival.
Web Summary : प्राजक्ता माली ने कान्स में मराठी विरासत का प्रदर्शन किया, अकलूज के सावंत परिवार से मिली एक पारंपरिक 'नथ' और प्राचीन गहने पहने। उन्होंने मराठी संस्कृति को वैश्विक मंच पर प्रस्तुत करने के अवसर के लिए आभार व्यक्त किया। अशोक सराफ और अन्य भी महोत्सव में शामिल हुए।