Join us
Daily Top 2Weekly Top 5

प्राजक्ता माळीचा 'डोक्याला शॉट'

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2018 21:00 IST

अभिनेत्री प्राजक्ता माळी 'डोक्याला शॉट' या चित्रपटात दिसणार आहे.

ठळक मुद्देप्राजक्ता माळी दिसणार 'डोक्याला शॉट' चित्रपटात

मालिका, चित्रपट व नाटक अशा तिन्ही माध्यमात आपल्या अभिनयाने सर्वांना भुरळ पाडणारी अभिनेत्री प्राजक्ता माळी 'पार्टी' चित्रपटात प्रमुख भूमिकेत झळकली होती. तिने छोट्या पडद्यावरील 'जुळून येती रेशीमगाठी' मालिकेत मेघनाच्या भूमिकेतून घराघरात पोहचली. याआधीही तिने 'सुवासिनी', 'बंध रेशमाचे', 'गाणे तुमचे आमचे', 'सुगरण' अशा मालिकांमध्ये काम केले होते. 'खो-खो', 'संघर्ष', 'गोळाबेरीज' अशा मराठी सिनेमांमध्येही प्राजक्ताने वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. सध्या प्राजक्ताची 'नकटीच्या लग्नाला यायचं हं', ही मालिका रसिकांच्या पसंतीस पात्र ठरली. या मालिकेतील प्राजक्ताचा खट्याळ अंदाज आणि पारंपरिक लूक रसिकांना चांगलाच भावला.आता ती 'डोक्याला शॉट' या चित्रपटात दिसणार आहे. या सिनेमाची घोषणा तिने सोशल मीडियावर केली आहे.

प्राजक्ताने सोशल मीडियावर चित्रपटाची घोषणा करीत लिहिले की, 'मी फटाके फोडत नाही. म्हणून लवकरच येऊ घातलेल्या चित्रपटाची घोषणा करून व्हर्चुअल धमाका करते आहे.' 'डोक्याला शॉट' या चित्रपटाची निर्मिती अ विवा इनेन प्रोडक्शन व उत्तुंग हितेंद्र ठाकूर यांनी केली आहे. या चित्रपटाचा लोगो प्राजक्ताने शेअर केला आहे. या चित्रपटात प्राजक्तासोबत कोण कलाकार आहेत व कथा अद्याप गुलदस्त्यात आहे. प्राजक्ताचा हटके शीर्षक असलेला हा चित्रपट रुपेरी पडद्यावर पाहण्यासाठी तिचे चाहते उत्सुक आहेत. 

टॅग्स :प्राजक्ता माळी