Join us
Daily Top 2Weekly Top 5

रसिकांनाही चढणार 'मैत्रीचा हँँगओव्हर',प्राजक्ता माळीची 'पार्टी' रसिकांच्या भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2018 17:28 IST

'मैत्रीचा हँँगओव्हर' असे उपशिर्षक असलेल्या या सिनेमात सुव्रत जोशी, अक्षय टंकसाळे या मराठीतील लीडिंग कलाकारांचादेखील समावेश आहे.   

आपल्या सहजसुंदर अभिनयाने मराठीचा छोटा आणि मोठा पडदा गाजवणारी अभिनेत्री प्राजक्ता माळी एका 'पार्टी'च्या निमित्ताने लवकरच प्रेक्षकांसमोर येत आहे. येत्या ७ सप्टेंबरपासून संपूर्ण महाराष्ट्रात आयोजित केल्या जाणा-या या 'पार्टी'चे सचिन दरेकर यांनी दिग्दर्शन केले आहे. सुपरहिट फिल्म 'बकेट लिस्ट' चे निर्माते असलेले डार्क हॉर्स प्रोडक्शन्सचे जमाश्प बापुना आणि अमित पंकज पारीख प्रस्तुत तसेच नवविधा प्रोडक्शनचे जितेंद्र चीवेलकर निर्मित 'पार्टी' या सिनेमात प्राजक्ता एका वेगळ्या भूमिकेतून रसिकांसमोर येणार आहे. मैत्रीवर आधारित असलेल्या या सिनेमात ती 'अर्पिता' नावाची भूमिका साकारणार आहे. प्राजक्ताने आतापर्यंत साकारलेल्या प्रत्येक भूमिकेला तिने योग्य न्याय दिला असल्यामुळे, या सिनेमातील तिची भूमिकादेखील लोकांच्या चांगलीच लक्षात राहील, यात शंका नाही. 'मैत्रीचा हँँगओव्हर' असे उपशिर्षक असलेल्या या सिनेमात सुव्रत जोशी, अक्षय टंकसाळे या मराठीतील लीडिंग कलाकारांचादेखील समावेश आहे.   

'दिल दोस्ती दुनियादारी' या लोकप्रिय मालिकेतील 'निशा' आठवतेय का? राकेशच्या प्रेयसीच्या भूमिकेत असलेली ही निशा, म्हणजेच मंजिरी पुपाला लवकरच मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. सचिन दरेकर दिग्दर्शित 'पार्टी' सिनेमात ती 'दिपाली' नामक एका बिनधास्त मुलीची व्यक्तिरेखा साकारणार आहे. यापूर्वी मंजिरीने हिंदी आणि मराठी नाटकांमध्ये काम केले असून, 'ग्रहण' मालिकांद्वारे ती सध्या घराघरात पोहोचत आहे. मैत्रीवर आधारित असलेला हा सिनेमा  'फ्रेन्डशिप डे'च्या महिन्यात म्हणजेच ७ सप्टेंबरला प्रदर्शित होत आहे. 'पार्टी' सिनेमाची प्रस्तुती सुपरहिट फिल्म 'बकेट लिस्ट' चे निर्माते असलेले डार्क हॉर्स प्रोडक्शन्सचे जमाश्प बापुना आणि अमित पंकज पारीख यांनी केली असून,  नवविधा प्रोडक्शनचे जितेंद्र चीवेलकर यांनी या सिनेमाची निर्मिती केली आहे. मित्रांच्या या 'पार्टी' सिनेमात तिच्यासोबत सुव्रत जोशी, अक्षय टांकसाळे, स्तवन शिंदे, रोहित हळदीकर आणि प्राजक्ता माळी हे कलाकारदेखील झळकणार आहेत. 'पार्टी' चित्रपटाचा ट्रेलर तुम्ही पाहिला का?

मैत्रीचा हँगओव्हर चढवणाऱ्या या ट्रेलरमध्ये सुव्रत जोशी, अक्षय टंकसाळे, स्तवन शिंदे, रोहित हळदीकर या चार मित्रांची धमाल-मस्ती आणि त्यांची लव्हस्टोरी आपणास पाहायला मिळते. पण त्यासोबतच कालांतराने विभक्त झालेल्या या चौकडीचं दुखणंदेखील यात दिसून येते. तसेच प्राजक्ता माळी आणि मंजिरी पुपालादेखील यात दिसून येत आहेत. शिवाय या ट्रेलरमधील 'घराचा व गाडीचा हफ्ता भरताना मैत्रीचादेखील हफ्ता भरायचा असतो, हे विसरून जातो आपण' हा संवाददेखील प्रेक्षकांना भावूक करून टाकतोय. आपापल्या आयुष्यात आणि संसारात गुंग झाल्यानंतर मागे राहून गेलेल्या जुन्या मित्रांची आठवण 'पार्टी' सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांना करून देतोय. हा ट्रेलर लाँच होऊन काहीच तास झाले असले तरी या ट्रेलरला प्रेक्षकांचा खूपच चांगला प्रतिसाद मिळत आहे. 

 

टॅग्स :प्राजक्ता माळी