Join us

हिरव्या रंगाच्या साडीत खुललं प्राजक्ता माळीचं सौंदर्य, फोटोंवर होतोय कमेंट्सचा वर्षाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2019 07:15 IST

अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने आपल्या अभिनयाने रसिकांची मनं जिंकली आहेत.

अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने आपल्या अभिनयाने रसिकांची मनं जिंकली आहेत. छोटा पडदा असो किंवा रुपेरी पडदा प्राजक्ताच्या अभिनयावर रसिक फिदा आहेत. सहजसुंदर अभिनय, घायाळ करणारं सौंदर्य आणि अदा तसंच लक्षवेधी स्टाईल यामुळे प्राजक्ताने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवण्यास सुरुवात केली. प्राजक्ता सोशल मीडियावरही बरीच सक्रिय आहे.

प्राजक्ताने नुकतंच इंस्टाग्रामवर हिरव्या रंगाच्या साडीतील फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये ती खूपच सुंदर दिसते आहे. या फोटोत प्राजक्ताना हिरव्या लाल रंगाची साडी नेसली असून त्यावर तिने हिरव्या रंगाची मोठी टिकली देखील लावली आहे. हा फोटो शेअर करून प्राजक्ताने लिहिले की, रोमांस, पॅशन व इनोसन्स. प्राजक्ता माळी काही दिवसांपूर्वी युरोप टूरवर गेली होती. तिथले फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले होते. 

प्राजक्ताच्या इंस्टाग्राम अकाउंटवर तिचे ग्लॅमरस, हॉट तर कधी एथनिक लूकमधील फोटो पहायला मिळत असतात.

सिनेमा असो किंवा पसर्नल लाईफ अगदी  आगामी प्रोजेक्टबद्दलची माहिती ही ती आपल्या फॅन्ससह शेअर करते. आपले फोटोसुद्धा फॅन्ससह शेअर करत असते आणि त्यांच्याशी संवादही साधत असते. तिचे फॅन्सही तिच्या फोटोंना भरभरुन लाईक्स आणि कमेंट्सच्या माध्यमातून पसंती देत असतात.

मालिका, नाटक आणि सिनेमा अशा वेगवेगळ्या माध्यमांमध्ये तिने विविध भूमिका साकारल्या आहेत. 

प्राजक्ता प्रशिक्षित भरतनाट्यम नृत्यांगना असून तिने अरंगेत्रम आणि विशारद पूर्ण केले आहे.

यासह प्राजक्ताला सांस्कृतिक विभागाकडून भरतनाट्यमसाठी शिष्यवृत्तीही देण्यात आली आहे. 

टॅग्स :प्राजक्ता माळी