Join us

युरोपच्या रस्त्यांवर फिरतेय 'ही' मराठमोळी अभिनेत्री, ओळखलंत का तिला कोण आहे ती ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2019 11:09 IST

सुव्रत जोशीसोबत 'डोक्याला शॉट' सिनेमात शेवटची दिसली होती. यात तिने सुब्बुलक्ष्मी नावाच्या मुलीची भूमिका साकारली होती. 

ठळक मुद्देआपल्या बिझी शेड्यूलमधून स्वत: साठी वेळ काढून ती युरोप एन्जॉय करताना दिसतेय.आपल्या अभिनयाने रसिकांची मनं जिंकली आहेत

अभिनेत्री प्राजक्ता माळी सध्या व्हॅकेशन मुडमध्ये आहे. तिने आपल्या युरोप टूरचे फोटो फॅन्ससोबत इन्स्टाग्रामवर नुकतेच शेअर केले आहेत. या फोटोंना प्राजक्ताने  वेगवेगळे कॅप्शनदेखील दिले आहेत. आपल्या बिझी शेड्यूलमधून स्वत: साठी वेळ काढून प्राजक्ता युरोप एन्जॉय करताना दिसतेय. प्राजक्ता सुव्रत जोशीसोबत 'डोक्याला शॉट' सिनेमात शेवटची दिसली होती. यात तिने सुब्बुलक्ष्मी नावाच्या मुलीची भूमिका साकारली होती. 

अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने आपल्या अभिनयाने रसिकांची मनं जिंकली आहेत. छोटा पडदा असो किंवा रुपेरी पडदा प्राजक्ताच्या अभिनयावर रसिक फिदा आहेत. सहजसुंदर अभिनय, घायाळ करणारं सौंदर्य आणि अदा तसंच लक्षवेधी स्टाईल यामुळे प्राजक्ताने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवण्यास सुरुवात केली. प्राजक्ता सोशल मीडियावरही बरीच सक्रिय आहे.

सिनेमा असो किंवा पसर्नल लाईफ अगदी  आगामी प्रोजेक्टबद्दलची माहिती ही ती आपल्या फॅन्ससह शेअर करते. आपले फोटोसुद्धा फॅन्ससह शेअर करत असते आणि त्यांच्याशी संवादही साधत असते. तिचे फॅन्सही तिच्या फोटोंना भरभरुन लाईक्स आणि कमेंट्सच्या माध्यमातून पसंती देत असतात. मालिका, नाटक आणि सिनेमा अशा वेगवेगळ्या माध्यमांमध्ये तिने विविध भूमिका साकारल्या आहेत. 

प्राजक्ता प्रशिक्षित भरतनाट्यम नृत्यांगना असून तिने अरंगेत्रम आणि विशारद पूर्ण केले आहे. यासह प्राजक्ताला सांस्कृतिक विभागाकडून भरतनाट्यमसाठी शिष्यवृत्तीही देण्यात आली आहे. 

टॅग्स :प्राजक्ता माळीडोक्याला शॉट