Join us

लग्नाआधी प्राजक्ता गायकवाडच्या ‘स्मार्ट सुनबाई’चा ट्रेलर प्रदर्शित, ऑनस्क्रीन रोमान्स करताना दिसली अभिनेत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2025 13:52 IST

मराठी चित्रपटसृष्टीत नव्या उत्साहाची लाट निर्माण करत ‘स्मार्ट सुनबाई’ या बहुप्रतीक्षित चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. हा आगामी मराठी चित्रपट प्रेक्षकांसाठी एक संपूर्ण कौटुंबिक मेजवानी ठरणार आहे.

मराठी चित्रपटसृष्टीत नव्या उत्साहाची लाट निर्माण करत ‘स्मार्ट सुनबाई’ या बहुप्रतीक्षित चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. हा आगामी मराठी चित्रपट प्रेक्षकांसाठी एक संपूर्ण कौटुंबिक मेजवानी ठरणार आहे. सिनेमाच्या ट्रेलरने प्रेक्षकांची उत्सुकता चांगलीच वाढवली आहे. विशेष म्हणजे 'स्मार्ट सूनबाई' सिनेमाचं ट्रेलर लॉन्च सर्व टीमच्या उपस्थितीत मध्य प्रदेशातील नलखेडामधल्या बगलामुखी देवी मंदिर येथे करण्यात आला. 

चित्रपटातील रोमँटिक गीतांचा गोडवा या कथेला नव्या रंगात रंगवतो आणि प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं भावविश्व निर्माण करतो. हसवणूक, रहस्य आणि कौटुंबिक नात्यांच्या गुंतागुंतीच्या वातावरणातही या सुरेल गाण्यांनी प्रेम आणि भावना यांची एक सुंदर छटा निर्माण केली आहे. प्रत्येक गाणं हे कथानकाच्या प्रवाहाशी घट्ट जोडलेलं असून, ते पात्रांच्या भावनांना अधिक खोली देतं.  आकर्षक दृश्यरचना, प्रभावी संवाद आणि नात्यांच्या गुंतागुंतीतून उलगडणारी कथा या ट्रेलरमधून झळकते. महाराष्ट्रीय सण-उत्सवांच्या रंगांनी सजलेलं वातावरण, रहस्याची झलक, कौटुंबिक विनोद आणि अनपेक्षित घटनांनी भरलेली ही कथा प्रेक्षकांना कधी हसवते तर कधी विचार करायला लावते. 

शिवाजी दोलताडे दिग्दर्शित आणि गोवर्धन दोलताडे, गार्गी निर्मित, कार्तिक दोलताडे पाटील सह निर्मित 'स्मार्ट सुनबाई' सिनेमात मराठी चित्रपटसृष्टीतील अनुभवी कलाकारांची झगमगती फळी एकत्र आली आहे. संतोष जुवेकर, रोहन पाटील, भाऊ कदम, किशोरी शहाणे, सायली देवधर, मोहन जोशी, दीपक शिर्के, प्राजक्ता हनमघर, प्राजक्ता गायकवाड, उषा नाईक, अंशुमन विचारे, स्नेहल शिदम, विनम्र बाबल, भक्ती चव्हाण, दीप्ती सोनवणे, अनुष्का बेनके, पूजा राजपूत, सुचिका जोशी, विद्या मेहेत्रे, मोनिका बंगाळ, आर्या सकुंडे, वैशाली चौधरी, सपना पवार, कांचन चौधरी अशी सिनेमाची कास्ट आहे. 

चित्रपटाची कथा आणि लेखन योगेश शिरसाट यांनी प्रभावीपणे साकारले असून, विजय नारायण गवंडे आणि साई–पियुष यांनी या चित्रपटाला सुरेल संगीताची साथ दिली आहे. गीतकार वैभव देशमुख आणि अदिती द्रविड यांच्या सुंदर लेखणीतून उमटलेली गाणी, तर अजय गोगावले, वैशाली माढे, आनंदी जोशी, सावनी रवींद्र आणि उर्मिला धनगर यांच्या मधुर आवाजाने सजलेली ही संगीतमय मेजवानी ‘स्मार्ट सुनबाई’ला एक वेगळीच ओळख देणार आहे. ‘स्मार्ट सुनबाई’ नक्कीच प्रेक्षकांसाठी एक ताजं, रंगतदार आणि पूर्णतः एंटरटेनिंग अनुभव ठरणार आहे. हा सिनेमा २१ नोव्हेंबर २०२५ पासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Prajakta Gaikwad's 'Smart Sunbai' Trailer Released: On-screen Romance Unveiled

Web Summary : ‘Smart Sunbai’ trailer unveils family drama, romance, and music. Prajakta Gaikwad stars alongside experienced actors. The film promises entertainment with a blend of humor, mystery, and melodious songs. Releasing November 21, 2025.
टॅग्स :प्राजक्ता गायकवाडसंतोष जुवेकरसिनेमा