Join us

पूजा सावंत दिसली चिलिंग मूडमध्ये, पाहा तिचा कधीही न पहिलेला अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2019 10:56 IST

पूजाने विविध सिनेमांमधून दर्जेदार भूमिका साकारत चित्रपटसृष्टीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

पूजा सावंतने मराठी चित्रपटसृष्टीसोबतच बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाची छाप उमटविली आहे. क्षणभर विश्रांती या सिनेमातून मराठी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवलं. यानंतर आता गं बया, झकास, सतरंगी रे, दगडी चाळ, नीळकंठ मास्तर अशा अनेक मराठी सिनेमात वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. विविध सिनेमांमधून दर्जेदार भूमिका साकारत चित्रपटसृष्टीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

पूजा सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमीच फॅन्सच्या संपर्कात असते. आपले फोटो आणि व्हिडीओ ती त्यांच्यासह शेअर करत असते. ज्यात ती खूपच बोल्ड आणि ग्लॅमरस दिसते आहे.

पूजाने तिचा एका हॉट फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोत पूजाचा बोल्ड आणि ग्लॅमरस अंदाज दिसतोय. फोटोतला हा लूक पूजाचा बोल्ड अंदाज फॅन्सना चांगलाच भावला आहे. लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव तिच्या फोटोवर करण्यात आला आहे. या फोटोला पूजाने कॅप्शनदेखील दिले आहे. 

काही दिवसांपूर्वी  पूजाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर  कतरिना कैफसोबतचा फोटो शेअर केला होता.  दिवाळीच्या मुहूर्तावर दागिन्यांच्या जाहिरातीसाठी केलेले ते फोटोशूट होते. 

पूजा सावंतने मराठी चित्रपटसृष्टीसोबतच बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाची छाप उमटविली आहे. काही महिन्यांपूर्वी पूजाने बॉलिवूडमध्ये देखील पदार्पण केले आहे. 'जंगली' सिनेमात तिने शंकराची भूमिका बजावली असून ती महिला माहूत होती. तिच्या या भूमिकेचे देखील सर्वत्र कौतुक झाले होते.

टॅग्स :पूजा सावंत