Join us
Daily Top 2Weekly Top 5

भोंदूगिरी, स्त्रियांवरील अत्याचार प्रकरणी पूजा सावंतची प्रतिक्रिया, म्हणाली, "लोकांना..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2026 11:37 IST

पूजा सावंतचा 'सालबर्डी' सध्या प्रेक्षकांना थिएटरमध्ये खेचून आणत आहे. सिनेमात तिचा डॅशिंग पोलिस अधिकाऱ्याचा लूक पसंतीस पडतोय. भूमिकेबद्दल बोलताना तिने खऱ्या आयुष्यात स्त्रियांवर घडणाऱ्या अत्याचारावर प्रतिक्रिया दिली.

महाराष्ट्रात अशोक खरात प्रकरण बरंच चर्चेत आहे. अशोक खरातच्या भोंदूगिरीप्रकरणी सगळीकडून संतापाची लाट उसळली आहे. सध्या अशोक खरात पोलीस कोठडीत आहे. महाराष्ट्रात भोंदूगिरी प्रकरणी याआधीही अनेकांना अटक झाली आहे. अशाच भोंदूगिरीवर आधारित 'सालबर्डी' मराठी सिनेमा नुकताच रिलीज झाला आहे. सिनेमात अभिनेत्री पूजा सावंत पहिल्यांदाच पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत आहे. पी.आय. मनोरमा अशी तिची व्यक्तिरेखा आहे. नुकतंच पूजाने स्त्रियांवरील अत्याचार, भोंदूगिरीप्रकरणी प्रतिक्रिया दिली. 

लोकमत फिल्मीला  दिलेल्या मुलाखतीत पूजा सावंत म्हणाली, "आपल्याकडे गुन्हेगारांना शिक्षेची भीतीच नाहीये. लोकं गुन्हा करायला घाबरत नाहीयेत. त्यांना माहितीये न्यायालयात निकाल लागायला भरपूर वेळ लागणार. ही भीती नसल्यामुळे अजूनही स्त्रियांवर अत्याचार होत आहेत. मी पी आय मनोरमा म्हणून न्यायव्यवस्थेकडे विनंती करेन की विशेषत: स्त्रियांवर होणारे अत्याचार होत आहेत त्याची शिक्षा इतकी कठोर व्हावी की कोणातीह गुन्हेगार स्त्री ला हात लावण्याआधी विचार करेल."

पूजा सावंतचा 'सालबर्डी' सध्या प्रेक्षकांना थिएटरमध्ये खेचून आणत आहे. सिनेमात तिचा डॅशिंग पोलिस अधिकाऱ्याचा लूक पसंतीस पडतोय. ती या भूमिकेत उठून दिसत आहे. सामाजिक आणि वास्तववादी विषयांवर ठसा उमटवणाऱ्या रमेश चौधरी यांनी यावेळी रहस्य आणि थरार यांची सांगड घालत एक उत्कंठावर्धक सालबर्डी कथा पडद्यावर साकारली आहे. निर्माते अनिल देवडे पाटील, डॉ. गजानन जाधव आणि राम जाधव यांची भक्कम साथ लाभलेला हा चित्रपट नेब्यूला फिल्म्सच्या बॅनरखाली साकारला आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Pooja Sawant reacts to atrocities, fraud; demands stricter punishment.

Web Summary : Actress Pooja Sawant, starring as a police officer in 'Salberdi,' addresses Ashok Kharat's fraud case and rising atrocities against women. She urges the justice system for stricter punishments to deter criminals.
टॅग्स :मराठी अभिनेतामराठी चित्रपट