Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘पाटील’ चित्रपटाचा संगीत अनावरण सोहळा संपन्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2018 14:16 IST

‘पाटील ध्यास स्वप्नांचा’ हा चित्रपट २६ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

ठळक मुद्दे‘पाटील’ या चित्रपटात एकूण पाच गाणी ‘पाटील’ या चित्रपटाचा संगीत अनावरण सोहळा संपन्न

समाजातील दाहक वास्तवावर प्रकाशझोत टाकणाऱ्या चित्रपटांना प्रेक्षकांनी नेहमीच चांगला प्रतिसाद दिला आहे. अशाच एका जिद्दी युवकाच्या संघर्षाचा वेध घेणाऱ्या ‘पाटील’ या मराठी चित्रपटाचा म्युझिक लाँच नुकताच महाराष्ट्राचे महसूल, मदत-पुनर्वसन आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते मोठ्या दिमाखात संपन्न झाला. याप्रसंगी मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी श्रीकांत भारतीय, आमदार प्रसाद लाड, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार रामराव वडकुते, कोकण आयुक्त डॉ.जगदीश पाटील, स्वाती खोपकर, पांडुरंग लोलगे, रुपेश टाक, सतीश गोविंदवार, अचर्ना लोलगे, जयशील मिजगर आदी मान्यवर उपस्थित होते. दिग्दर्शक संतोष राममीना मिजगर यांच्या आजवरच्या प्रयत्नांचे कौतुक करताना ‘पाटील’ चित्रपटाला चंद्रकांतदादा पाटील यांच्यासह मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या. ‘पाटील’ या चित्रपटात एकूण पाच गाणी आहेत. यातील ‘पाटील पाटील’ हे धडाकेबाज गाणे आनंद शिंदे, आदर्श शिंदे  यांनी गायले असून ‘तुला पाहून’ हे रोमँटिक गीत बिष्णू मोहन, बेला शेंडे यांच्या गायकीने खुलले आहे. ‘सूर्य थांबला’ या मनस्पर्शी  गीताला  सुखविंदर सिंग व रेहा विवेक यांचा स्वर लाभला आहे. ‘राधेला पाहून’ व ‘धिन ताक धिन’ या ठेका धरायला लावणाऱ्या गीतांना गणपत मिजगर, बाबुल सुप्रियो, श्रेया घोषाल यांनी स्वरबद्ध केले आहे. या चित्रपटाची गीते गुरु ठाकूर, समीर, सुरेश पांडा-जाफर, संजय वारंग, एस.आर.एम यांनी शब्दबद्ध केली असून संगीत आनंद-मिलिंद, सोनाली उदय, प्रभाकर नरवाडे, डी.एच.हारमोनी, एस.आर.एम.एलियन यांनी दिले आहे. पार्श्वसंगीत अमर मोहिले यांचे आहे. ‘पाटील’ चित्रपटाची ध्वनीफित ‘झी म्युझिक’ने प्रकाशित केली आहे. या चित्रपटात शिवाजी पाटील यांचा प्रेरणादायी प्रवास मांडला आहे. ‘पाटील’ या चित्रपटाची कथा,पटकथा आणि दिग्दर्शन संतोष राममीना मिजगर यांचे आहे. बॉलीवूड टुरिझम आणि‘ए व्ही के एंटरटेन्मेंट’ या  चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते आहेत. तेजल शहा, नीता लाड, जय मिजगर, सतीश गोविंदवार, गोपीचंद पडळकर, मधुकर लोलगे, रुपेश टाक हे चित्रपटाचे निर्माते असून गणेश बीडकर, रामराव वडकुते, संतुकराव हंबर्डे,  शिवाजी कांबळे, सुधीर पाटील, सौरभ तांडेल,  विजय जैन, जेनील शाह, सोमनाथ दिंगबर, हाजी पटेल, दिपक दलाल सहनिर्माते आहेत. विवेक सिंग कार्यकारी निर्माते आहेत. निलेश गावंड, मनीष शिर्के यांचे संकलन तर छायांकन सुधाकर रेड्डी यकांती, राजा यांचे आहे. नृत्यदिग्दर्शन सुभाष नकाशे यांनी केले आहे. वेशभूषा पृथा मांजरेकर, ज्योती मुलगीर यांनी केली आहे. ध्वनी अनिरुद्ध काळे तर व्ही.एफ एक्सची जबाबदारी प्रशांत मेहता तर कला दिग्दर्शनाची जबाबदारी सुरेश पिल्ले यांनी सांभाळली आहे.शिवाजी लोटन पाटील, वर्षा दांदळे, भाग्यश्री मोटे, नरेंद्र देशमुख, प्रतिमा देशपांडे, सुरेश पिल्ले, कपिल कांबळे एस.आर.एम एलियन, यश आदि कलाकारांच्या या चित्रपटात भूमिका आहेत. विशेष भूमिकेत कोकण आयुक्त डॉ.जगदीश पाटील दिसणार आहेत. स्टार क्राफ्ट मनोरंजन प्रा.लि. सचिकेत प्रोडक्शन्स, शौभम सिनेव्हिजन्स प्रा.लि निर्मित ‘पाटील ध्यास स्वप्नांचा’ हा चित्रपट २६ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

टॅग्स :पाटील