Join us
Daily Top 2Weekly Top 5

लंडनच्या रस्त्यावर मराठी कलाकारांचा बॉलिवूड गाण्यावर डान्स, व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2024 16:09 IST

'रंग माझा वेगळा' फेम अभिनेता आशुतोष गोखलेने एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये ते लंडनच्या रस्त्यावर नाचताना दिसत आहेत. 

अनेक सेलिब्रिटींचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. आपल्या आवडत्या कलाकारांबद्दल जाणून घेण्यात चाहत्यांनादेखील रस असतो. व्हॅकेशन किंवा वैयक्तिक आयुष्यात कलाकार हॉलिडे कसा साजरा करतात, याबाबत जाणून घेण्यात चाहते उत्सुक असतात. सध्या मराठी सिनेइंडस्ट्रीतील काही कलाकार नाटकाच्या दौऱ्यानिमित्त परदेशात आहेत. त्यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे. 

'जर तरची गोष्ट...' या नाटकाची टीम लंडन दौऱ्यावर आहे. नाटकाचे प्रयोग करण्याबरोबरच कलाकार तिथे मज्जा मस्तीदेखील करत आहेत. सोशल मीडियावरुन कलाकारांनी लंडून दौऱ्याचे फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत. 'जर तरची गोष्ट' नाटकात प्रिया बापट, पल्लवी पाटील, आशुतोष गोखले आणि उमेश कामत मुख्य भूमिकेत आहेत. प्रियाने लंडनमधील अनेक फोटो शेअर केले होते. आता 'रंग माझा वेगळा' फेम अभिनेता आशुतोष गोखलेने एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये ते लंडनच्या रस्त्यावर नाचताना दिसत आहेत. 

लंडनमधील मॉब डान्समध्ये आशुतोष आणि पल्लवी सहभागी झाल्याचं दिसत आहे. त्यांच्याबरोबर अमोघ फडकेदेखील दिसत आहे. लंडनच्या रस्त्यावर आशुतोष, पल्लवी आणि अमोघ गंगनाम स्टाइल या बॉलिवूड गाण्यावर थिरकताना दिसत आहेत. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओवर चाहत्यांनी मजेशीर कमेंटही केल्या आहेत. 

टॅग्स :टिव्ही कलाकारमराठी अभिनेतापल्लवी पाटील