Join us

अग्गंss बाई... तुमची लाडकी 'आसावरी' म्हणजेच निवेदिता सराफ आहेत 'बिझनेस वुमन'

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2020 14:32 IST

अशोक सराफ व निवेदिता यांच्यात 18 वर्षांचे अंतर आहे. ते पत्नीपेक्षा 18 वर्षांनी मोठे आहेत.

कलाकार मंडळी मालिका आणि सिनेमात अभिनय करण्याबरोबरच इतर गोष्टींमध्येही विशेष लक्ष देऊ लागले आहेत. बॉलिवूडमध्ये अनेक कलाकारा अभिनयाव्यतिरिक्त स्वतःचा बिझनेस करतात. अभिनयासह स्वतःचा बिझनेस सुरु करण्याचा हा ट्रेंड आता मराठीतही पाहायला मिळत आहे. अभिनेत्री निवेदिता सराफ या देखील अभिनयाव्यतिरिक्त स्वतःचा बिझनेस करतात.

अभिनयाशिवाय काही तरी हटके करण्याचा नेहमीच त्यांचा प्रयत्न असतो.त्यांनी सुरू केलेल्या बिझनेसचं  नाव हंसगामिनी आहे. विविध प्रकारच्या साड्या त्यांना स्वतःला आवडतात. असच एकदा त्यांना कळलं कि एके ठिकाणी पुरामुळे स्थानिक साडी कलाकारांचं नुकसान झालं आहे.त्यांनी आपल्या मैत्रिणीबरोबर पुढाकार घेतला आणि न नफा न तोटा या तत्वावर त्या साड्या विकण्यात मदत केली होती. विविध ठिकाणी त्या साड्यांचे एक्झिबिशनही भरवतात. त्यांच्या या एक्झिबिशनलाही भरभरून प्रतिसाद मिळतो. 

अशी सुरू झाली होती दोघांची लव्हस्टोरी !

अशोक सराफ व निवेदिता यांच्यात 18 वर्षांचे अंतर आहे. ते पत्नीपेक्षा 18 वर्षांनी मोठे आहेत.अशोक सराफ यांचा जन्म 4 जून 1947 रोजी झाला. तर निवेदिता जोशी-सराफ यांचा जन्म 6 जून 1965 चा आहे. या दोघांच्या वयात तब्बल 18 वर्षांचे अंतर आहे. शोक सराफ यांचा ‘दोन्ही घरचा पाहुणा’ हा सिनेमा रिलीज झाला तेव्हा निवेदिता फक्त सहा वर्षांच्या होत्या. विशेष म्हणजे, पुढे निवेदिता यांना अशोक सराफ यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली. एकत्र काम करता करता दोघांची चांगली मैत्री झाली आणि पुढे दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. यानंतर दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला.

अशी झाली होती अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांची पहिली भेट

अशोक सराफ व निवेदिता यांची पहिली भेट ‘डार्लिंग डार्लिंग’ या नाटकाच्या वेळी झाली होती. ही माझी छोटीशी मुलगी, असे म्हणत निवेदिताच्या बाबांनी तिची अशोक सराफ यांच्याशी ओळख करून दिली होती. ‘नवरी मिळे नव-याला’ या सिनेमाच्या सेटवर निवेदिता व अशोक यांच्यात प्रेम फुलले. ‘धुमधडाका’च्या सेटवर हे प्रेम आणखीच बहरले. दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला. पण प्रत्येक प्रेमकहाणीत एक ट्विस्ट असतोच. तो यांच्याही प्रेमकहाणीत होता.

टॅग्स :निवेदिता सराफअशोक सराफ