Join us
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय पुरस्कार विजेते रवी जाधव करणार हिंदी वेबसिरीजचे दिग्दर्शन, जाणून घ्या याविषयी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2022 12:21 IST

रवी जाधव हे मराठी इंडस्ट्रीतील सर्वात प्रभावी दिग्दर्शकांपैकी एक आहेत. त्यांनी दिग्दर्शित केलेल्या नटरंग आणि बालगंधर्व या दोन उत्कृष्ट चित्रपटांना राष्ट्रीय पुरस्कार मिळालेले आहेत.

रवी जाधव हे मराठी इंडस्ट्रीतील सर्वात प्रभावी दिग्दर्शकांपैकी एक आहेत. त्यांनी दिग्दर्शित केलेल्या नटरंग आणि बालगंधर्व या दोन उत्कृष्ट चित्रपटांना राष्ट्रीय पुरस्कार मिळालेले आहेत. त्यांचे बालक पालक, टाइमपास, न्यूड हे काही लोकप्रिय आणि सर्वत्र कौतुक झालेले चित्रपट आहेत.  दिग्दर्शक रवी जाधव GSEAMS या एक हिंदी वेब सिरीजचे दिग्दर्शन करणार आहेत.  क्षितिज पटवर्धनने लिहिली आहे.

क्षितिज पटवर्धन हे एक भारतीय पटकथा लेखक, नाट्यदिग्दर्शक, नाटककार आणि गीतकार आहेत. त्यांना 2018 मध्ये सर्वोत्कृष्ट पटकथेसाठी फिल्मफेअर पुरस्कार, 2020 मध्ये सर्वोत्कृष्ट गीतलेखनासाठी फिल्मफेअर पुरस्कार, प्रतिष्ठित तरुण तेजंकित पुरस्कार 2019 मिळालेला आहे. त्यांना महाराष्ट्र राज्याचे अनेक पुरस्कार मिळालेले आहेत.

 मराठी चित्रपटसृष्टीतील त्यांच्या अतुलनीय योगदानाबद्दल राज्य पुरस्कार, झी गौरव, मिफ्ता आणि स्टार प्रवाह रत्न यासारख्या पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आलेले आहे.  चित्रपट आणि टेलिव्हिजन उद्योगातील सर्वात प्रतिभावान लेखकांपैकी एक मानले जाते. टाईमपास, टाइम प्लीज, आघात, वाय झेड, क्लासमेट्स या चित्रपटांसाठी त्यांनी लेखन केलेले आहे.

 

टॅग्स :रवी जाधव