Join us

सिंघम बिंगम काय नाय, नुसता अण्णा..., नागराज मंजुळेंचा असा कडक लुक तुम्ही कधीच पाहिला नसेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2023 15:34 IST

Ghar Banduk Biryani New Song Haan Hi Badiv : 'घर बंदूक बिरयानी'चं 'हान की बडीव' गाणं रिलीज, राया पाटीलपुढे सगळेच फेल

Ghar Banduk Biryani New Song Haan Hi Badiv  : दिग्दर्शक, अभिनेते नागराज मंजुळेंचा (Nagraj  Manjule) 'घर बंदूक बिरयानी' हा सिनेमा येत्या ७ एप्रिल रोजी चित्रपटगृहांत धडकणार आहे. तूर्तास या चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. सर्वाधिक हवा केलीये ती राया पाटील यांनी. होय, नागराज मंजुळे हे या सिनेमात राया पाटील नावाच्या एका कडक पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारत आहेत.  याच  राया पाटीलवर चित्रीत केलेलं 'हान की बडीव' हे गाणं रिलीज झालं आहे आणि यातील राया पाटीलचा कडक लुक, स्वॅग बघून चाहतेही थक्क झाले आहेत.

'घर बंदूक बिरयानी'चे गुन गुन आणि आहा हेरो ही दोन गाणी आधीच प्रदर्शित झालीत. आता  सिनेमातील नवं गाणं 'हान की बडीव' प्रदर्शित झालं आहे. या गाण्यातील नागराज अण्णांना पाहून तुम्ही दबंग, सिंघमलाही विसराल.  संपूर्ण गाणं नागराज यांच्यावर चित्रित झालं आहे. नागराज अण्णांचा लुक कडक आहेच, शिवाय गाण्याचे बोलही तितकेच कडक आहेत.

 

'न्यायाचा, पठ्ठ्या न्यायाचा... डेरिंग छातीचा... लेक ह्यो मातीचा.. भल्या संग हाय भला... बुऱ्या संग बुरा बुरा... हाय गडी खरा खुरा' अशी या गाण्याची सुरुवात होते. गाण्यामध्ये नागराज फुल्ल ॲक्शन मोडमध्ये दिसतात.

सध्या या गाण्यानं सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. नागराज यांचा कडक लुक चाहत्यांना भलताच आवडला आहे. अनेकांनी यावर कमेंट्स करत, नागराज अण्णांचं कौतुक केलं आहे. सिंघम बिंगम काय नाय, नुसता आण्णा, सुट्टी नॉट!!, अशी कमेंट एका चाहत्याने केली आहे. काय Swag आहे, हा माणूस बॉलीवुड आणि टॉलीवुड ला नक्कीच मागे टाकणार..., असं एकाने लिहिलं आहे.'घर बंदूक बिरयानी' हा सिनेमा ७ एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. यात नागराज मंजुळेंसह आकाश ठोसर,सयाजी शिंदे, सायली पाटील यांच्या मुख्य भूमिकेत आहेत.

टॅग्स :नागराज मंजुळेमराठी अभिनेतामराठी चित्रपट