Join us

"आयुष्य हॉटेलसारखं आहे, इच्छा असो किंवा नसो...", 'नाच गं घुमा' फेम अभिनेत्रीची पोस्ट चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2024 16:06 IST

"चेक इन करताना चेक आऊटचा दिवसही ठरलेला असतो", 'नाच गं घुमा' फेम अभिनेत्रीच्या पोस्टने वेधलं लक्ष

'नाच गं घुमा' हा मराठी सिनेमा सध्या गाजतोय. मुक्ता बर्वे आणि नम्रता संभेराव मुख्य भूमिकेत असलेल्या हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. या सिनेमात अभिनेत्री मधुगंधा कुलकर्णीने देखील छोटीशी भूमिका साकारली आहे. अभिनेत्री असण्याबरोबरच मधुगंधा एक उत्तम लेखिकादेखील आहे. 'नाच गं घुमा' सिनेमाचं लेखनही मधुगंधाने केलं आहे. 

मधुगंधा सोशल मीडियावरही प्रचंड चर्चेत असल्याचं पाहायला मिळतं. नवीन प्रोजेक्टची माहिती चाहत्यांना ती पोस्टद्वारे देत असते. त्याबरोबरच वैयक्तिक आयुष्यातील अपडेट्सही मधुगंधा चाहत्यांना देते. आतादेखील मधुगंधाच्या एका पोस्टने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. मधुगंधाने तिचा एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या फोटोला तिने दिलेलं कॅप्शन चर्चेत आलं आहे. 

मधुगंधा कुलकर्णीच्या पोस्टने वेधलं लक्ष 

आयुष्य हेच एक हॉटेल आहे असं वाटतं. चेक इन होतो आपण, काही काळ राहतो.इच्छा असो नसो, चेक आऊट आहेच ! 

चेक इन करताना चेक आऊटचा दिवसही ठरलेला असतो !इथे आपण रमतो...घुमतो..राहतो खातो पितो...हेच ते...ज्याच्यासाठी सगळं केलं असं वाटतं ...आपल्याला कुठल्या catogary ची रूम मिळणार हे आपण काय कमावलं आहे यावर ठरतं!

आयुष्य आणि रिसॉर्ट...सगळं तेच आहे.थोडी उसंत मिळाली की काहीसं spiritual व्हायला होतं...गरजेचं पण आहे.

रिसॉर्ट आहे जग हे सारेचेक इन ,चेक आऊटअव्याहत खेळ अपुरेसंचिताचे भोग हे न्यारे!

धुगंधाच्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंटही केल्या आहेत. अभिनेत्री सुकन्या मोनेंनी तिच्या पोस्टवर कमेंट करत "लिहितेस उत्तमच पण अलिकडे दिसतेस ही छान..." असं म्हटलं आहे. 

मधुगंधा कुलकर्णीने अनेक मालिका आणि सिनेमांमध्येही काम केलं आहे. 'जुळून येती रेशीमगाठी' मालिकेतील तिची भूमिका गाजली होती. 'चि. व चि.सौ.का', 'वाळवी', 'एलिझाबेथ एकादशी' या सिनेमांचं तिने लेखन केलं आहे.'नाच गं घुमा' सिनेमात मुक्ता बर्वे, मधुगंधा कुलकर्णी, नम्रता संभेराव यांच्याबरोबर सुकन्या मोने, सुप्रिया पाठारे, मायरा वायकूळ, सारंग साठ्ये यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.  

टॅग्स :सिनेमासेलिब्रिटी