Join us
Daily Top 2Weekly Top 5

"आणि कमिटमेंट एवढी की पोहे..."; हॉटेलचा विचित्र कारभार पाहून संतापली मुक्ता बर्वे

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2023 13:01 IST

Mukta Barve: एका प्रवासादरम्यान मुक्ताला एका हॉटेलमध्ये वाईट अनुभव आला.

मराठी कलाविश्वातील गुणी आणि अभ्यासू अभिनेत्री म्हणजे मुक्ता बर्वे (mukta barve). नाटक, मालिका आणि सिनेमा अशा विविध माध्यमातून तिने प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडली. मुक्ता कलाविश्वासह सोशल मीडियावरही तितकीच सक्रीय आहे. त्यामुळे बऱ्याचदा तिने केलेल्या पोस्ट चर्चेत येत असतात. अलिकडेच तिने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

एका प्रवासादरम्यान मुक्ताला एका हॉटेलमध्ये वाईट अनुभव आला. मुक्ताने या हॉटेलमध्ये कांदेपोहे ऑर्डर केले होते. मात्र, प्रत्यक्षात तिला ज्या पद्धतीचे पोहे मिळाले ते पाहून तिचा हिरमोड झाला. ज्यानंतर तिने पोस्ट शेअर करत या हॉटेल आणि येथे देण्यात येणाऱ्या सर्व्हिसविषयी भाष्य केलं. 

मुक्ता बर्वे ही मराठी मनोरंजन विश्वातील चर्चेतील अभिनेत्री. मुक्ताने आजवर अनेक सिनेमा, मालिका, नाटकांमधून स्वतःची छाप पाडली. मुक्ता बर्वे ही मराठी मनोरंजन विश्वातील संवेदनशील अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.

काय आहे मुक्ताची पोस्ट?माझा विश्वासच बसेना!

खरं तर मी ‘श्री दत्त स्नॅक्स’ ची फॅन आहे. मुंबई-पुणे करताना अनेकदा तिथे आवर्जून खाण्याचा ब्रेक घेते मी. आज नाशिक ला जाताना पडघा टोल नंतर खूप कौतुकानी थांबले आणि पोहे मागवले. अत्यंत अनास्थेनी , गरम असल्याचा भास होईल एवढेच जेमतेम गरम पोहे त्यांनी दिले. आणि कमिटमेंट एवढी की पोहे म्हणजे फक्त पोहे. कांदा-मीठ आणि साखर बास! जरा चव यावी म्हणुन कदाचित शेंगदाणे, शेव, कोथिंबीर, गेलाबाजार लिंबू .. यातलं काहिच नाही. पैसे वाया गेल्याच्या दुःखापेक्षा भूक लागलेली असताना समोरच्या डीश मधे कोणीतरी एवढी अनास्था वाढुन दिली याचं वाईट वाटलं.

दरम्यान,  मुक्ता सध्या चारचौघी या नाटकात काम करत आहे. या नाटकात तिच्यासोबत पर्ण पेठे, रोहिणी हट्टंगडी, कादंबरी कदम हे कलाकार दिसून येत आहेत.

टॅग्स :मुक्ता बर्वेनाटकपर्ण पेठेसेलिब्रिटी