Join us
Daily Top 2Weekly Top 5

Mukta Barve : जेव्हा सोमवारचा प्रयोगही 'हाऊसफुल्ल' होतो; नाटकवेड्या रसिकांसाठी मुक्ता बर्वेची पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2022 12:10 IST

मराठी नाटकांवर प्रेम करणाऱ्या रसिकांची संख्या कमी नाही. असाच एक अनुभव मराठीतील आघाडीची अभिनेत्री मुक्ता बर्वेलाही आला आहे

Mukta Barve : चांगल्या मराठीनाटकांना रसिक आजही भरघोस प्रतिसाद देतात आणि प्रयोग हाऊसफुल्ल (Housefull) होतो हे वेळोवेळी सिद्ध झाले आहे. मराठीनाटकांवर प्रेम करणाऱ्या रसिकांची संख्या कमी नाही. असाच एक अनुभव मराठीतील आघाडीची अभिनेत्री मुक्ता बर्वेलाही आला आहे. बऱ्याचदा तिकीट मिळत नाही म्हणून रसिक निराश होतात, प्रेमळ तक्रार करतात अशा रसिकांसाठी केलेला सोमवारचा प्रयोगही हाऊसफुल्ल होतो हे बघून मुक्ता भावूक झाली आहे.

मुक्ताने मानले प्रेक्षकांचे आभार 

मोठ्या ब्रेकनंतर मुक्ता रंगभूमीवर परतली आहे.  सध्या ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी, मुक्ता बर्वे, कादंबरी कदम आणि पर्ण पेठे यांचे चारचौघी हे नाटक गाजत आहे. अनेक ठिकाणी नाटकाचे प्रयोग हाऊसफुल्ल होत आहेत. फुल्ल झाल्यामुळे इतर रसिकांना तिकीट मिळत नाही तेव्हा ते निराश होतात कारण नाटक बघण्याची खूप इच्छा असते. अशा रसिकांसाठी सोमवारीही चारचौघीचा प्रयोग ठेवला गेला. आणि तो प्रयोग हाऊसफुल्ल झाला. या नाटकवेड्या रसिकांचे मुक्ता बर्वेने स्टेजवरील व्हिडिओ पोस्ट करत आभार मानले आहेत.

मुक्ता बर्वेला अनेक वर्षांनी रंगभूमीवर बघून चाहते प्रचंड खूश आहेत. त्यात चारचौघीचे प्रयोगही जोरात सुरु आहेत. तर दुसरीकडे मुक्ताचा नुकताच 'आपडी थापडी' हा सिनेमा रिलीज झाला होता. यामध्ये तिने श्रेयस तळपदेही मुख्य भुमिकेत होता.
टॅग्स :नाटकमुक्ता बर्वेपर्ण पेठेमराठी अभिनेतामराठी