Join us
Daily Top 2Weekly Top 5

"देवाने तुमच्यासारखा साचा बनवणं केव्हाच सोडून दिलंय...", राज ठाकरेंसाठी तेजस्विनीची पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2025 14:41 IST

Raj Thackeray Birthday: मराठी अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिनेदेखील राज ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त खास पोस्ट शेअर केली आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. राज ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त त्यांचे समर्थक आणि चाहत्यांनी सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. काही सेलिब्रिटींनीही राज ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. मराठी अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिनेदेखील राज ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त खास पोस्ट शेअर केली आहे. 

तेजस्विनीने राज ठाकरेंसोबतचा फोटो तिच्या सोशल मीडियावर शेअर केला आहे. यासोबतच तिने पोस्ट लिहित राज ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. "मराठी अस्मितेच्या पाठीराख्याला, मराठी भाषेच्या पोषिंद्याला, महाराष्ट्राच्या भूमीपुत्राला आणि ह्या सगळ्या पलीकडे एका मनस्वी ,सच्च्या, अनोख्या व्यक्तिमत्वाला वाढदिवसानिमित्त लक्ष लक्ष शुभेच्छा ! राजसाहेब...खरंच, तुमच्यासारखा साचा देवाने बनवणं केंव्हाच सोडून दिलं ! देव तुम्हाला दीर्घायु देवो आणि तुमच्या सगळ्या मनोकामना पूर्ण करो ! हसत रहा", असं तेजस्विनीने पोस्टमध्ये म्हटलं आहे. 

तेजस्विनी ही मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. अनेक मालिका, सिनेमा आणि वेब सीरिजमध्येही तिने काम केलं आहे. तेजस्विनी समाजातील अनेक मुद्द्यांवर बेधडकपणे तिचं मत व्यक्त करताना दिसते. अनेकदा तिने राज ठाकरे आणि मनसेला उघडपणे पाठिंबाही दिला आहे. अभिनेत्री असण्याबरोबरच तेजस्विनीने आता निर्मिती क्षेत्रातही पाऊल ठेवलं आहे. 

टॅग्स :तेजस्विनी पंडितराज ठाकरेमनसे