Join us
Daily Top 2Weekly Top 5

सिद्धार्थ-मिताली आईबाबा होणार? अभिनेत्रीने केला खुलासा; म्हणाली, 'ते एक गाणं...'

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2023 13:21 IST

मितालीने पोस्ट केलेला नवा फोटो आणि त्याखाली लिहिलेलं कॅप्शन चर्चेत.

मराठी सिनेइंडस्ट्रीतील गोड कपल सिद्धार्थ चांदेकर (Siddharth Chandekar) आणि मिताली मयेकर (Mitali Mayekar) नेहमीच त्यांच्या रोमँटिक फोटोंमुळे चर्चेत असतात. दोघंही काही दिवसांपूर्वीच युरोप ट्रिपवरुन परत आले आहेत. पॅरिसच्या आयफेल टॉवरवरील त्यांच्या रोमँटिक फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला होता. तसंच मितालीच्या बिकीनीतील अवताराने लक्ष वेधून घेतलं होतं. तर आता कपल लवकरच गुडन्यूज देणार आहे या चर्चांना उधाण आलंय. याचं कारण म्हणजे मितालीने पोस्ट केलेला नवा फोटो आणि त्याखाली लिहिलेलं कॅप्शन. मात्र प्रेग्नंसीच्या चर्चांवर स्वत: मितालीने खुलासा केला आहे.

मिताली सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव्ह असते. तिच्या फोटोशूटने ती चाहत्यांना घायाळ करते. तसंच ती फिट अभिनेत्रींपैकी एक आहे. तर मितालीने काही तासांपूर्वीच एक फोटो पोस्ट केलाय. काळ्या रंगाच्या शॉर्ट वनपीसमध्ये ती एकदम हॉट दिसते. कुरळे केस आणि थोडा मेकअप यामुळे तिचं सौंदर्य खुललं आहे. एका बेंचवर बसून तिने हा फोटो काढलाय. पण या फोटोला दिलेलं कॅप्शन फारच इंटरेस्टिंग आणि चाहत्यांना संभ्रमात टाकणारं आहे. 'मॉमी इज गेटिंग हॉट' असं कॅप्शन तिने दिलं आहे. 

मितालीने हा फोटो आणि कॅप्शन पोस्ट करताच चर्चांना उधाण आलंय. 'म्हणजे तुझं काय म्हणणंय की तू प्रेग्नंट आहेस?' अशी कमेंट एका चाहतीने केली आहे. मात्र मितालीने या चर्चांचं खंडन केलं आहे. खरंतर 'मॉमी इज गेटिंग हॉट' हे तिचं आवडीचं गाणं आहे आणि ते तिने कॅप्शनमध्ये लिहिलं इतकंच.

मिताली आणि सिद्धार्थ यांच्या लग्नाला दोन वर्ष झाली आहेत. 24 जानेवारी 2021 रोजी पुण्याच्या ढेपेवाड्यात दोघांनी अगदी मराठमोळ्या पद्धतीने लग्न केले. त्यांच्या लग्नाचा अल्बम, व्हिडिओ, फोटो खूप व्हायरल झाले. लग्नापूर्वी दोघंही काही काळ लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होते. काही दिवसांपूर्वीच मुंबईत स्वत:चं घर घेतल्याची बातमी त्यांनी दिली होती. आता कुटुंबात तिसऱ्या पाहुण्याचं आगमन होणार का याविषयी मिताली आणि सिद्धार्थ कधी खुलासा करतात याकडे चाहत्यांचं लक्ष लागलं आहे. 

टॅग्स :मिताली मयेकरसिद्धार्थ चांदेकरमराठी अभिनेताप्रेग्नंसीसोशल मीडिया