Join us
Daily Top 2Weekly Top 5

“कुणी पार्किंग देता का पार्किंग?”, प्रसिद्ध मराठी लेखकाची पोस्ट चर्चेत, म्हणाला, “मुंबईत घर घ्यायचं...”

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2023 16:25 IST

मुंबईच्या पार्किंगबाबत मराठी लेखकाने केलेल्या इन्स्टाग्राम पोस्टने वेधलं लक्ष

‘फास्टर फेणे’, ‘डबलसीट’, ‘धुरळा’ या चित्रपटांमुळे नावारुपास आलेला प्रसिद्ध मराठी लेखक क्षितीज पटवर्धन त्याच्या ताली या वेब सीरिजमुळे सध्या चर्चेत आहे. सुश्मिता सेन मुख्य भूमिकेत असलेल्या या वेब सीरिजची पटकथा आणि संवाद क्षितीजने लिहिले आहेत. त्याने अनेक मराठी आणि हिंदी सिनेमांसाठी गीतकाराची भूमिका बजावली आहे. क्षितीज सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. समाजातील अनेक घडामोंडीवर तो पोस्टच्या माध्यमातून व्यक्त होताना दिसतो.

सध्या क्षितीजच्या अशीच एका पोस्टची चर्चा रंगली आहे. मुंबईतीलपार्किंग समस्येवर क्षितीजने अगदी मोजक्या शब्दांत उपहासात्मक पोस्ट केली आहे. “लोकांचं मुंबईत घर घ्यायचं स्वप्न असतं, माझं पार्किंग घ्यायचं आहे,” असं त्याने इन्स्टाग्राम पोस्टमध्ये म्हटलं आहे. या पोस्टला त्याने “कुणी पार्किंग देता का पार्किंग?” असं कॅप्शन दिलं आहे. क्षितीजने या पोस्टमधून मुंबईतील पार्किंगच्या समस्येकडे बोट ठेवलं आहे. त्याच्या या पोस्टने सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं आहे.

प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्याचं अवघ्या २५ वर्षी निधन, कार्डियक अरेस्टमुळे गमावला जीव

“बॉडीगार्डचं डोकं फाटलं, माझ्या डोळ्याला...”, मानसी नाईकने सांगितला अपघाताचा धक्कादायक अनुभव

क्षितीजच्या या पोस्टवर चाहत्यांबरोबरच सेलिब्रिटींनीही कमेंट केल्या आहेत. जितेंद्र जोशीने कमेंट करत “विकत की भाडेतत्वावर?” अशी कमेंट केली आहे. यावर उत्तर देत क्षितीजने “कुणी फेकून मारली तरी चालेल, पण द्या”, असा रिप्लाय करत हसण्याचे इमोजी पोस्ट केले आहेत. तर एका युजरने “मी गाडी घ्यायच्या आधी पार्किंग विकत घेतलं होतं”, असं म्हटलं आहे. “गाडीपेक्षा पार्किंगचा रेट जास्त आहे,” अशी कमेंटही नेटकऱ्याने केली आहे.

 

टॅग्स :मराठी अभिनेतामुंबईपार्किंगमराठी चित्रपटमराठी गाणी