Join us
Daily Top 2Weekly Top 5

कुर्यात सदा मंगलम्! लोकप्रिय गायिका शुभांगी केदारने बांधली लग्नगाठ, कोण आहे तिचा नवरा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2026 17:31 IST

लोकप्रिय मराठी गायिकाही लग्नाच्या बेडीत अडकली आहे. सिंगर शुभांगी केदार हिचा विवाहसोहळा नुकताच पार पडला आहे. 

मराठी कलाविश्वात सध्या लगीनघाई सुरू आहे. अनेक सेलिब्रिटी लग्नाच्या बेडीत अडकले आहेत. तर काही लग्न करण्याच्या तयारीत आहेत. नुकतंच साक्षी महाजन आणि अथर्व कर्वे यांनी लग्न करत नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. त्यांच्यापाठोपाठ लोकप्रिय मराठी गायिकाही लग्नाच्या बेडीत अडकली आहे. सिंगर शुभांगी केदार हिचा विवाहसोहळा नुकताच पार पडला आहे. 

शुभांगीच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ समोर आले आहेत. लग्नासाठी शुभांगीने खास लूक केला होता. नऊवारी साडीत पारंपरिक अंदाजात ती नटली होती. तर तिच्या नवऱ्याने धोतर घातलं होतं. पारंपरिक पद्धतीने त्यांचा विवाहसोहळा पार पडला. रिसेप्शनसाठी दोघांनी खास लूक केल्याचं पाहायला मिळालं. हिरव्या रंगाच्या साडीमध्ये शुभांगीचं सौंदर्य खुललं होतं. एका व्हिडीओमध्ये तिची लग्नातील लूकची झलक दिसत आहे. 

शुभांगीच्या नवऱ्याचं नाव प्रणित वानवे असं आहे. गेल्या काही दिवसांपासून ते रिलेशनशिपमध्ये होते. प्रणितदेखील एक कलाकार आहे. शुभांगीच्या अनेक अल्बम साँगमध्येही त्याने मदत केली आहे.  शुभांगी एक लोकप्रिय गायिका आहे. गोव्याच्या किनाऱ्यावर या गाण्यामुळे तिला प्रसिद्धी मिळाली. तिचं ऐरणीच्या देवा तुला हे गाणंही लोकप्रिय झालं. 

English
हिंदी सारांश
Web Title : Marathi Singer Shubhangi Kedar Ties Knot; Know Her Husband!

Web Summary : Marathi singer Shubhangi Kedar recently married Pranit Wanve in a traditional ceremony. Shubhangi wore a traditional nine-yard saree, while Pranit wore a dhoti. Pranit is also an artist and has collaborated with Shubhangi on her music albums. She gained popularity with the song 'Goa Chya Kinaryavar'.
टॅग्स :टिव्ही कलाकारसेलिब्रेटी वेडिंग