Join us

'झिम्मा'ची बॉक्स ऑफिसवर यशस्वी घोडदौड; दोन आठवड्यात गाठला कोट्यवधींचा टप्पा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2021 19:16 IST

Jhimma: गेल्या दोन आठवड्यांपासून या चित्रपटाचे शो हाऊसफूल सुरु असून पहिल्याच आठवड्यात ३२५ शोज लागले. त्यानंतर दुसऱ्या आठवड्यात ७०० पेक्षा जास्त म्हणजेच दुपटीहून अधिक शोज लागले होते.

गेल्या दोन वर्षांपासून बंद असलेली चित्रपटगृहे सुरु झाली आणि नवनवीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले. आतापर्यंत अनेक बॉलिवूड चित्रपट सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित झाले असून यात मराठी चित्रपट झिम्मादेखील चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. विशेष म्हणजे हा चित्रपट तुफान लोकप्रिय ठरत असून त्याची बॉक्स ऑफिसवर यशस्वी घोडदौड सुरु आहे. केवळ दोन आठवड्यांमध्ये या चित्रपटाने कोट्यवधींची गगन भरारी घेतली आहे. 

दोन आठवड्यांपासून या चित्रपटाचे शो हाऊसफूल सुरु असून पहिल्याच आठवड्यात ३२५ शोज लागले. त्यानंतर दुसऱ्या आठवड्यात ७०० पेक्षा जास्त म्हणजेच दुपटीहून अधिक शोज लागले होते. विशेष म्हणजे ५० टक्के सीट्सची परवानगी असतानाही पहिल्या दोन आठवड्यांमध्ये 'झिम्मा'ने ५.८३ करोडचा टप्पा पार केला. लॉकडाउननंतर सुपरहिट ठरलेला 'झिम्मा' हा पहिला मराठी चित्रपट आहे. चित्रपटाचे छायाचित्रण, पटकथा, संवाद, दिग्दर्शन, अभिनय या सगळ्याच गोष्टी उत्तम जमून आल्याने प्रेक्षकांनी या चित्रपटाला पसंती दिली. 'चलचित्र कंपनी' प्रस्तुत 'अमेय विनोद खोपकर एंटरटेनमेंट' आणि 'क्रेझी फ्यू फिल्म्स' निर्मित 'झिम्मा' वर सर्व स्तरांमधून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

दरम्यान, या चित्रपटात सिद्धार्थ चांदेकर, निर्मिती सावंत, सुहास जोशी, सुचित्रा बांदेकर, क्षिती जोग, सोनाली, सायली संजीव, मृण्मयी गोडबोले यांच्या मुख्य भूमिका आहेत. या चित्रपटाचं लेखन इरावती कर्णिक यांनी केलं असून दिग्दर्शन हेमंत ढोमने केलं आहे. 

टॅग्स :सिनेमासेलिब्रिटीसोनाली कुलकर्णीसायली संजीव