Join us

गणेश आचार्यच्या तालावर आकाश, सयाजी शिंदेंनी धरला ताल; पाहा 'आहा हेरो'चा making video

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2023 14:07 IST

Ghar Banduk Biryani:'आहा हेरो' या मिळत असलेल्या प्रतिसादानंतर नागराज मंजुळे यांनी या गाण्याचा मेकिंग व्हिडीओ शेअर केला आहे.

सध्या सोशल मीडियावर बहुप्रतिक्षीत ठरत असलेल्या 'घर बंदूक बिरयानी' (Ghar Banduk Biryani) या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु आहे. 'सैराट' (sairat), 'फँड्री' (fandry), 'पिस्तुल्या' (pistulya) आणि 'झुंड' (zund) यांसारख्या दर्जेदार चित्रपटांनंतर नागराज मंजुळे (nagraj manjule) यांचा 'घर बंदूक बिरयानी' हा चित्रपट येतोय. त्यामुळे या नव्या चित्रपटात नेमकं कोणतं कथानक पाहायला मिळणार याची प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे.  नुकतीच या चित्रपटातील दोन गाणी प्रदर्शित झाली असून त्यातील 'आहा हेरो' (Aaha Hero) हे गाणं लोकप्रिय ठरत आहे.

'आहा हेरो' या मिळत असलेल्या प्रतिसादानंतर नागराज मंजुळे यांनी या गाण्याचा मेकिंग व्हिडीओ शेअर केला आहे. विशेष म्हणजे हे गाणं प्रसिद्ध कोरिओग्राफर गणेश आचार्य यांनी कोरिओग्राफ केलं आहे. 'आहा हेरो' या जबरदस्त गाण्याला प्रवीण कुवर, विवेक नाईक, संतोष बोटे, राहुल चिटणीस यांचा आवाज लाभला असून गणेश आचार्य यांचे नृत्य दिग्दर्शन लाभलेले आहे. हे गाणं सयाजी शिंदे आणि आकाश ठोसर यांच्यावर चित्रीत करण्यात आले आहे.

दरम्यान, ७ एप्रिल रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत असून या चित्रपटाचं सयाजी शिंदे, आकाश ठोसर, सायली पाटील यांच्या मुख्य भूमिका आहेत. या चित्रपटाचं दिग्दर्शन हेमंत अवताडे यांनी केलं आहे. तर, निर्मिती झी स्टुडिओज आणि नागराज मंजुळे यांनी केली आहे. 

टॅग्स :सिनेमानागराज मंजुळेसयाजी शिंदेगणेश आचार्य