Join us

Video: रवी जाधवने घडवली बाप्पाची सुंदर मुर्ती; गणरायाच्या आगमनासाठी सेलिब्रिटी सज्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2022 13:59 IST

Ravi Jadhav: मराठी कलाविश्वातील अनेक कलाकार त्यांच्या हाताने गणरायाची मुर्ती घडवतात. यामध्येच रवी जाधव यांचाही समावेश आहे.

गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे सध्या सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत सगळ्यांकडेच लगबग सुरु झाली आहे. प्रत्येक जण बाप्पाच्या आगमनासाठी आतुर झाले आहेत. त्यामुळेच बाप्पाची आरास, प्रसाद, डेकोरेशन यांच्या तयारीत सगळे लागले आहेत. यात सेलिब्रिटीदेखील मागे नाहीत. सध्या लोकप्रिय दिग्दर्शक रवी जाधव (Ravi Jadhav) यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात ते स्वत:च्या हाताने बाप्पाची मुर्ती घडवताना दिसत आहेत.

मराठी कलाविश्वातील अनेक कलाकार त्यांच्या हाताने गणरायाची मुर्ती घडवतात. यामध्येच रवी जाधव यांचाही समावेश आहे. अलिकडेच त्यांनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ते गणरायाची छानशी मुर्ती घडवताना दिसत आहेत. त्यामुळे आता बाप्पाच्या आगमनासाठी ते सज्ज झाल्याचं दिसून येत आहे.

"आपला बाप्पा आपणच घडविण्याइतका दुसरा आनंद नाही!!! गणेशोत्सवाचे मंतरलेले १० दिवस आता जवळ आले आहेत. संपूर्ण महाराष्ट्राप्रमाणे आमचीही तयारी जोरात सुरु आहे. अजून रंगकाम बाकी आहे. ते झाल्यावर नक्कीच शेअर करीन!!!गणपती बाप्पा मोरया", असं कॅप्शन देत रवी जाधन यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. 

टॅग्स :गणेशोत्सव विधीसेलिब्रिटीरवी जाधव