Join us
Daily Top 2Weekly Top 5

Kedar Shinde : तुमच्या साक्षीने वचन देतो, यापुढे तिच्या ओटीत..., केदार शिंदे यांची बायकोसाठी खास पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2023 11:54 IST

Kedar Shinde : आज केदार शिंदे यांच्या पत्नी बेला शिंदे यांचा 50 वा वाढदिवस. केदार शिंदे यांनी खास पोस्ट शेअर करत पत्नी बेला यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज लेखक-दिग्दर्शक म्हणून केदार शिंदे ( Kedar Shinde) यांची वेगळी ओळख करून देण्याची गरज नाही. त्यांचं काम उभ्या महाराष्ट्रानं पाहिलं आहे. लवकरच त्यांचा ‘महाराष्ट्र शाहीर’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. शाहीर साबळे यांच्यावर जीवनावर आधारित या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा आहे. शिवाय त्यांची एक ताजी पोस्टही तुफान व्हायरल होतेय. ही पोस्ट त्यांनी लिहिलीये ती खास बायकोसाठी. होय, आज केदार शिंदे यांच्या पत्नी बेला शिंदे यांचा 50 वा वाढदिवस. केदार शिंदे यांनी खास पोस्ट शेअर करत पत्नी बेला यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

ते लिहितात, ‘वाढदिवस आज जीचा आहे ती माझं सर्वस्व आहे. आयुष्यातले अनेक चढउतार तिच्या सोबत मी अनुभवले आणि अनुभवतोय. मी नाटक सिरीयल सिनेमा या तीनही क्षेत्रात जे काम करू शकलो ते तीच्या भक्कम पाठिंबा असल्यानेच. कारण एका ठिकाणी स्थिरावण्याच्या आत मी  दुसऱ्या  मिडीयम मध्ये उडी मारली. पण तीने कधी हू का चू केलं नाही. पैसा येतो आणि तोही स्थिरावण्याआधी त्याला सतरा पारंब्या फुटतात. पण ही मात्र नेटाने पाठीशी. ही आणि स्वामी नसते तर मी नक्कीच नसतो....२०२३ ५०वर्षाचीझाली.. तुमच्या साक्षीने वचन देतो.. आता यापुढे तीच्या ओटीत खुप काही पडेल असंच काम करणार. श्री स्वामी समर्थ,’  

केदार शिंदे आणि बेला शिंदे हे मराठीतील एक आदर्श जोडपं मानलं जातं.  केदार शिंदे यांनी प्रचंड संघर्ष करून हे यश मिळवलं आहे. या काळात पत्नी बेला त्यांची सावली बनून खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभ्या राहिल्या. केदार शिंदे व बेला दोघेही कॉलेज लाइफ पासून एकत्र आहेत. गेल्या वर्षीच त्यांच्या लग्नाला 25 वर्षे पूर्ण झालीत.

टॅग्स :केदार शिंदेमराठी चित्रपट