Prarthana Behre Emotional Post: मराठी सिनेविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री प्रार्थना बेहेरे हे नाव कलाविश्वासाठी नवं नाही. आजवर तिने अनेक उत्तोमोत्तम सिनेमे इंडस्ट्रीला दिले आहेत. आपल्या चेहऱ्यावर कायम स्मितहास्य असणाऱ्या या नायिकेच्या कुटुंबावर दु खाचा डोंगर कोसळला आहे. प्रार्थनाच्या वडिलांचं एका अपघातात निधन झालं आहे. वयाच्या ७५ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अभिनेत्री प्रार्थना बेहेरेने स्वत याबाबत पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे.
दरम्यान, नुकताच प्रार्थना बेहेरेने इन्स्टाग्रामवर तिच्या वडिलांचा एक फोटो शेअर केला आहे. त्यासोबत भावुक कॅप्शन लिहित अभिनेत्रीने म्हटलंय...,
“मर के भी किसी को याद आएंगे,
किसी के आंसुओं में मुस्कुराएंगे
कहेगा फूल हर कली से बार बार
जीना इसी का नाम है “ ....!
माझे बाबा .... १४ ऑक्टोबर रोजी त्यांचे निधन दुर्दैवाने एका road अपघातात झाले”
यापुढे तिने लिहिलंय, "बाबा ....... तुमच्या जाण्यानंतर आयुष्य जणू थांबल्यासारखं वाटतंय ,तुमचं हास्य अजूनही आमच्या कानात गुंजतं, तुमचा आत्मविश्वास आमच्या मनाला बळ देतो, आणि तुमचं जीवन पाहून आम्हाला शिकायला मिळालं की आनंद म्हणजे परिस्थिती नव्हे, तर दृष्टिकोन असतो. तुमचा प्रामाणिकपणा, सेवाभाव आणि लोकांप्रती असलेलं निस्सीम प्रेम आम्हाला माणुसकीचं खरं मूल्य शिकवून गेलं.तुम्ही आम्हाला शिकवलंत की इतरांना मदत करणे हेच खरं समाधान आहे."
तुमची अचानक झालेली exit, मनाला भयंकर लागली...
"आज तुम्ही आमच्यासोबत नसला तरी तुमचा आवाज आणि गाणी आम्हाला सतत बळ देतात. तुमची अचानक झालेली exit, मनाला भयंकर लागली आहे. काल परवा पर्यंत सगळ अलबेल होतं. तुमच्या अकाली जाण्याने आम्ही सगळेच खुप दुखावलो आहोत. प्रत्येक क्षणी तुमची आठवण येतच रहाणार आहे.पण या सगळ्या घटनेला वेगळ्या दृष्टीने पाहीलं तर, तुम्ही अधिक प्रत्येकाच्या जवळ रहाणार आहात. कारण तुम्ही स्मरणात रहाणार. प्रत्येक वेळी प्रत्येक क्षणी, आम्ही आमच्या मनाला वाटेल तेव्हा, तुमच्याशी संवाद साधू शकतोय.तुम्हाला आजपर्यंत अभिमान वाटेल अशीच कामगिरी मी करत आली आहे. आता अधिक जोमाने कामाला सुरुवात करणार आहे. तुम्ही जिथे कुठे असाल, तुम्हाला माझ्या अप्रतिम कामाने श्रध्दांजली अर्पण करत रहाणं, हे माझं कर्तव्य आहे. डोळ्यातलं पाणी कधीच तुम्हाला दिसू नये याची काळजी घेईन. कारण मलाही तुम्हाला धूसर पहायचं नाही. तुमचं ओठावरचं हसू, मनात घर करून राहीलं आहे. तेच टिकवण्याची जबाबदारी मी घेणार आहे. काळजी करू नका... मी खुप strong आहे. कारण माझ्या पाठीशी नाही तर, तुम्ही सोबत आहात याची खात्री आहे. I LOVE YOU BABA , MISS YOU FOREVER...", अशी भावुक पोस्ट अभिनेत्रीने लिहिली आहे.
प्रार्थना बेहेरेच्या या पोस्टवर मराठी सिनेसृष्टीतील कलाकारांनी तिच्या वडिलांना श्रद्धांजली वाहिली आहे. तसेच काहींनी अभिनेत्रीला धीर देण्याचा प्रयत्न केला आहे. वडिलांच्या निधनामुळे प्रार्थनाच्या संपूर्ण कुटुंबावर दु: खाचा डोंगर पसरला आहे.
Web Summary : Actress Prarthana Behere is mourning the loss of her father, who passed away in an accident at the age of 75. In an emotional post, she shared her grief and remembered his life lessons and values.
Web Summary : अभिनेत्री प्रार्थना बेहरे के पिता का 75 वर्ष की आयु में एक दुर्घटना में निधन हो गया। प्रार्थना ने एक भावुक पोस्ट में अपना दुख व्यक्त किया और उनके जीवन के सबक और मूल्यों को याद किया।