Join us
Daily Top 2Weekly Top 5

"या वेडेपणाचं एक तप पूर्ण...", हेमंत ढोमेने लग्नाच्या वाढदिवसानिमित्त शेअर केली खास पोस्ट; म्हणतो-"पाटलीणबाई..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2024 14:11 IST

अभिनेता हेमंत ढोमेने लग्नाच्या वाढदिवशी पाटलीणबाईंसाठी खास पोस्ट शेअर केली आहे. 

Hemant Dhome: अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माता या तिन्ही भूमिका उत्तमरित्या पेलणारा कलाकार म्हणजे हेमंत ढोमे (Hemant Dhome). सध्या सोशल मीडियावर हेमंतने शेअर केलेल्या पोस्टने नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. त्याने ही पोस्ट त्याची लाडकी बायको क्षिती जोगसाठी (Kshitee Jog) केली आहे. दरम्यान, मराठी कलाविश्वामध्ये अभिनेता हेमंत ढोमे आणि क्षिती जोग यांची जोडी प्रचंड लोकप्रिय आहे. या दोघांनी २०१२ मध्ये लग्नगाठ बांधली आणि त्यांच्या नव्या प्रवासाला सुरुवात केली. त्यांच्या सुखी संसाराला आज १२ वर्षे पूर्ण झाली आहेत. या निमित्ताने सोशल मीडियावर हेमंत ढोमेने लग्नाच्या वाढदिवशी पाटलीणबाईंसाठी खास पोस्ट शेअर केली आहे. 

हेमंत ढोमेने सोशल मीडियावर नुकताच पत्नीबरोबर एक खास फोटो शेअर केला आहे. या पोस्टच्या कॅप्शनने सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. लाडक्या बायकोसोबत फोटो पोस्ट करत त्याने कॅप्शनमध्ये लिहलंय, "या वेडेपणाचं एक तप पूर्ण! असाच वेडेपणा चालू ठेऊ, बाकी काय होतंय मग आपोआप. लव्ह यू पाटलीणबाई!" या दोघांच्या या गोड फोटोवर मराठी कलाकारांसह नेटकऱ्यांनी असंख्य प्रतिक्रिया दिल्या आहेत. 

हटके लव्हस्टोरी

हेमंत आणि क्षिती यांनी २०१२ मध्ये लग्नगाठ बांधली. एका मुलाखतीत क्षिती आणि हेमंत यांनी त्यांच्या पहिल्या भेटीबद्दल सांगितले होते. 'सावधान शुभमंगल या नाटाकाच्या रिहर्सलवेळी त्या दोघांची भेट झाली. त्याआधी हेमंत क्षितीला ओळखत होता. ती त्याच्या एका नाटकाला देखील गेली होते. पण सावधान शुभमंगल या नाटाकाच्या रिहर्सलच्या वेळी त्यांची ओळख झाली आणि नंतर त्यांच्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झाले.

टॅग्स :Hemant Dhome Today Newsमराठी अभिनेतासेलिब्रिटीसोशल मीडिया