Join us
Daily Top 2Weekly Top 5

बिग बॉस फेम सोनाली पाटीलची अभिनेते दिगंबर नाईकसोबत जमणार जोडी, जाणून घ्या याविषयी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2023 13:22 IST

कोल्हापुरची लवंगी मिरची असं बिरुद मिरवणाऱ्या सोनालीला बिग बॉस मराठीच्या माध्यमातून प्रचंड लोकप्रियता मिळवली.

आपल्या विनोदी टायमिंगने  रसिकांना खळखळून हसायला लावणारे अभिनेते दिगंबर नाईक सध्या एका बाईमुळे त्रस्त झाले आहेत. या बाईने त्यांना हैराण करून सोडलं आहे.बाई वाड्यातून जा असं ते म्हणतायेत. ही बाई  नेमकी कोण? ती वाड्यात का आली आहे? ती बाई वाड्यात राहणार ? की दिगंबर नाईक तिला घालवण्यात यशस्वी होणार का ? हे पाहायचं असेल तर अभिनेते दिगंबर नाईक आणि बिगबॉस फेम सोनाली पाटील यांचे आगमी  ‘बाई वाड्यातून जा’ हे धमाल विनोदी नाटक पाहावं लागेल. येत्या बुधवारी २९ मार्चला या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग रंगणार आहे. दिशा आणि कलारंजन प्रस्तुत या नाटकाचे निर्माते उदय साटम, प्रिया पाटील, आबा ढोले यांचे आहे.  नाटकाचे लेखन दिग्दर्शन संकेत तांडेल यांचे आहे.

या नाटकाची कथा एका जुन्या वाड्या भोवती फिरते. हा वाडा विकायचा असतो. तो विकताना एका बाईमुळे कसा गोंधळ उडतो? याची धमाल कथा ‘बाई वाड्यातून जा’ या नाटकातून पाहायला मिळणार आहे. अभिनेते दिगंबर नाईक आणि  बिगबॉस फेम सोनाली पाटील या दोघांसमवेत या नाटकात भूषण घाडी, दीपा माळकर, भावेश टिटवळकर, अश्वजीत सावंतफुले आदि कलाकारांच्या भूमिका आहेत. 

तब्बल चार वर्षांनी ‘बाई वाड्यातून जा’ या नाटकातून आपल्याला हसवायला सज्ज झालेले दिगंबर नाईक सांगतात, पुष्पगुच्छ जसा निरनिराळ्या फुलांनी समजलेला असतो तसंच हे नाटक सजलयं. धमाल मनोरंजन करणारं हे नाटक रसिकांना नक्की आवडेल असा विश्वास अभिनेते दिगंबर नाईक व्यक्त करतात.

टॅग्स :दिगंबर नाईकबिग बॉस मराठी