Join us
Daily Top 2Weekly Top 5

सुचित्राच्या नकारामुळे वैतागले होते आदेश बांदेकर; अखेर अभिनेत्रीचं घर गाठलं अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2023 13:36 IST

Adesh bandekar: सुचित्रा आणि आदेश बांदेकर यांची लव्हस्टोरी कोणत्याही सिनेमापेक्षा कमी नाही.

मराठी कलाविश्वातील लाडकं कपल म्हणजे आदेश बांदेकर (adesh bandekar)आणि सुचित्रा बांदेकर (suchitra bandekar). एकमेकांच्या प्रेमात पडून लग्नगाठ बांधलेल्या या जोडीचं प्रेम आजही कायम आहे. त्यामुळे त्यांच्या लव्हस्टोरीची नेटकऱ्यांमध्ये कायम चर्चा रंगत असते. सध्या या जोडीच्या प्रेमाचा एक किस्सा नेटकऱ्यांमध्ये चर्चिला जात आहे. आदेश बांदेकर यांनी सुचित्रा यांना कॉलेजमध्ये असतानाच लग्नाची मागणी घातली होती. मात्र, सुचित्रा यांच्याकडून वारंवार नकार मिळत होता. अखेरआदेश बांदेकरांनी थेट त्यांच्या घरी जाऊन होकार मिळवलं होता. त्यामुळे त्यांनी हा होकार कसा मिळवला ते जाणून घेऊयात.

सुचित्रा बांदेकर आज त्यांचा वाढदिवस साजरा करत आहेत. त्यामुळे त्याच्याविषयी अनेक गोष्टी चर्चिला जात आहेत. यामध्येच त्यांची आणि आदेश बांदेकर यांची लव्हस्टोरी सध्या चर्चेत आली आहे.

सुचित्रा बालमोहन शाळेत शिकत असताना त्यांचा मुलांशी बोलण्याचा फारसा संबंध येत नव्हता. त्यामुळे आठवी-नववीनंतर मुलांशी बोलणं त्याकाळी फार मोठी गोष्ट होती. त्यावेळी आदेश बांदेकर सुचित्राला भेटण्यासाठी शाळेच्या बाहेर यायचे. हे पाहून सुचित्रा खूप घाबरायच्या आणि माझं तुझ्यावर प्रेम नाहीये असं सांगून त्यांना तेथून निघून जायला सांगायच्या. सुचित्राकडून वारंवार मिळत असलेला नकार पाहून आदेश बांदेकर प्रचंड वैतागले होते. त्यामुळे त्यांनी असं एक पाऊल उचललं ज्यामुळे सुचित्रादेखील थक्क झाल्या होत्या.

सुचित्राचा नकार मिळत असल्यामुळे एक दिवस आदेश बांदेकर सुचित्राची आई घरी नसताना थेट तिच्या घरी गेले.  सुचित्राच्या घरी गेल्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा तिला लग्नाची मागणी घातली. विशेष म्हणजे आदेश बांदेकरांचे हे धाडस पाहून सुचित्रानेही त्यांना लगेच होकार दिला. इथून पुढे त्यांची खऱ्या अर्थाने लव्हस्टोरी सुरु झाली.

दरम्यान, शालेय शिक्षण झाल्यानंतर सुचित्रा यांनी रुपारेल कॉलेजमध्ये अॅडमिशन घेतलं. आदेश बांदेकर सुद्धा याच कॉलेजमध्ये असल्यामुळे त्यांची रोज भेट होऊ लागली. परंतु, आदेश आणि सुचित्रा यांच्या लग्नाला सुचित्राच्या घरातून कडाडून विरोध होता. परंतु, आदेश आणि सुचित्रा यांनी घरच्यांचा विरोध झुगारुन पळून जाऊन लग्न केलं. त्यावेळी सुचित्रा फर्स्ट इअरला शिकत होत्या. 

टॅग्स :आदेश बांदेकरसेलिब्रिटीटेलिव्हिजन