Join us
Daily Top 2Weekly Top 5

'हा' साऊथ स्टार आहे सोनाली कुलकर्णीचा क्रेश; पहिल्यांदाच सांगितलं जाहीरपणे नाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2023 17:37 IST

Sonali kulkarni: सोनालीने तिच्या पहिल्या प्रपोजविषयी देखील यावेळी सांगितलं आहे.

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे सोनाली कुलकर्णी (sonali kulkarni). मराठी इंडस्ट्रीतल अभ्यासू आणि तितकीच प्रतिभावान अभिनेत्री म्हणून सोनालीकडे पाहिलं जातं. मराठीसह बॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाचा डंका वाजवणाऱ्या सोनालीचे आज लाखो चाहते आहेत. मात्र, अनेकांच्या मनावर राज्य करणारी ही अभिनेत्री मात्र एका वेगळ्याच अभिनेत्याच्या प्रेमात आहे.

अलिकडेच सोनालीने लोकमत फिल्मीच्या My first या सेगमेंटमध्ये हजेरी लावली. यावेळी हा गेम खेळत असताना तिने तिच्या सेलिब्रिटी क्रशविषयी भाष्य केलं. तुझा पहिला सेलिब्रिटी क्रश कोण? असा प्रश्न सोनालीला विचारण्यात आला होता. यावेळी तिने एका लोकप्रिय साऊथ सुपरस्टारचं नाव घेतलं.

"पहिला क्रश कपिल देव पण तो स्पोर्ट्स स्टार आहे. तसे बरेच आहेत. पण, त्यातूनही कमल हासन, असं उत्तर सोनालीने दिलं. त्यामुळे तिचं हे उत्तर सध्या चर्चेत येत आहे."

दरम्यान, सोनाली मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. अग बाई अरेच्या 2, डॉ. प्रकाश बाबा आमटे, सिंघम, वेल डन अब्बा, दिल चाहता हैं, प्यार तुने क्या किया, गुलाबजाम अशा कितीतरी हिंदी, मराठी सिनेमांमध्ये काम केलं आहे. 

टॅग्स :सोनाली कुलकर्णीबॉलिवूडसेलिब्रिटीकमल हासन