Join us
Daily Top 2Weekly Top 5

सायली संजीव 'लालबागचा राजा' चरणी नतमस्तक, फोटो शेअर करत म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2023 12:39 IST

मराठी सेलिब्रिटींनी यावर्षीही मुंबईतील प्रसिद्ध अशा 'लालबागचा राजा'चे दर्शन घेतले. सायली संजीवही 'लालबागचा राजा'च्या दर्शनाला गेली होती. 

दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेशोत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला गेला. अनेक सेलिब्रिटींच्या घरीही बाप्पा विराजमान झाले होते. बॉलिवूडसह अनेक मराठी सेलिब्रिटींनी यावर्षीही मुंबईतील प्रसिद्ध अशा 'लालबागचा राजा'चे दर्शन घेतले. मराठी अभिनेत्री सायली संजीवही 'लालबागचा राजा'च्या दर्शनाला गेली होती. 

सायली संजीवने 'लालबागचा राजा'चं दर्शन घेतलं. 'लालबागचा राजा' चरणी सायली नतमस्तक झाली. सायलीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन 'लालबागचा राजा'च्या दर्शनाचे काही फोटो शेअर केले आहेत. 'लालबागचा राजा'च्या दर्शनासाठी सायलीने खास गुलाबी रंगाची साडी नेसून पारंपरिक लूक केला होता. 

सायली संजीव मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे.  'काहे दिया परदेस' मालिकेतून घराघरात पोहोचलेल्या सायलीने अनेक मालिका आणि चित्रपटांत काम केलं आहे. 'पैठणी' या तिच्या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. सायली सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. नवीन प्रोजेक्टबद्दल सायली पोस्टद्वारे चाहत्यांना माहिती देत असते. 

टॅग्स :सायली संजीवलालबागचा राजाटिव्ही कलाकार