Join us

केदारनाथ ट्रेकचा अविस्मरणीय प्रवास! निसर्गाचं मनमोहक दृश्य दाखवणारा रिंकूचा Video पाहा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2023 15:17 IST

रिंकूने तिच्या आयुष्यातील पहिल्या ट्रेकची झलक दाखवली आहे.

'सैराट' सिनेमातून घराघरात पोहोचलेली आर्ची म्हणजेच रिंकू राजगुरुची (Rinku Rajguru)  क्रेझ अजूनही कमी झालेली नाही. रिंकू सोशल मीडियावर काय पोस्ट करते, तिचा कोणता सिनेमा येणार याकडे चाहत्यांचं लक्ष असतंच. तर नुकतंच रिंकूने तिच्या आयुष्यातील पहिल्या ट्रेकची झलक दाखवली आहे. गेल्या काही दिवसांपासून ती केदारनाथ यात्रेचे फोटो पोस्ट करत होती. तर तिने आता या प्रवासाचा एक छानसा व्हिडिओ शेअर केलाय.

केदारनाथ ट्रेक, दमलेल्या अवस्थेत चढणं, हातात काठीचा आधार घेणं, मध्येच दिसणाऱ्या धबधब्याजवळ तोंड धुणं, निळ्याशार पाण्याजवळ निसर्गाचं मननोहक रुप पाहणं आणि नंतर अखेर केदारनाथ मंदिराचं दर्शन होणं हा सगळा अनुभव तिने या व्हिडिओतून चाहत्यांना दाखवला आहे. मैत्रिण पूजा वराडसोबत रिंकू केदारनाथच्या दर्शनाला गेली होती.  यावेळी मॅगी, आलू पराठा खातानाचा व्हिडिओही तिने शेअर केलाय. 

रिंकूने 'कधीही न विसरता येणारा अनुभव' असं कॅप्शन व्हिडिओला दिलंय. चाहत्यांनी रिंकूच्या या व्हिडिओवर कमेंट्सचा वर्षाव केलाय. सर्व यात्रेकरुंसोबत केदारनाथ दर्शन करण्याचा तिचा हा प्रवास किती सुंदर होता हे तिच्या व्हिडिओतून स्पष्ट दिसून येतंय. रिंकू सोशल मीडियावर खूप सक्रीय असते. तिचे हटके पण साधे पोस्ट आणि कॅप्शन चाहत्यांना नेहमीच भावतात.

टॅग्स :रिंकू राजगुरूकेदारनाथसोशल मीडिया