Join us
Daily Top 2Weekly Top 5

प्रार्थना बेहेरेने सुरु केला नवा बिझनेस; लॉन्च केला स्वत:चा ब्रँड

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2023 13:36 IST

Prarthana behere: प्रार्थनाचं नव्या क्षेत्रात पदार्पण

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे प्रार्थना बेहेरे. उत्तम अभिनयाच्या जोरावर प्रार्थनाने मराठी कलाविश्वात तिचं हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. मालिका, सिनेमा अशा विविध माध्यमांतून प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या प्रार्थनाच्या सौंदर्याचे आणि अभिनयाचे आज लाखो चाहते आहेत. विशेष म्हणजे आतापर्यंत अभिनयातून प्रेक्षकांचं मनोरंजन करणारी प्रार्थना आता बिझेनस वूमन झाली आहे.  नुकताच प्रार्थनाने तिचा नवा ब्रँड लॉन्च केला आहे.

प्रार्थना सोशल मीडियावर कमालीची सक्रीय आहे. त्यामुळे काही तासांपूर्वीच प्रार्थनाने लाईव्ह येत चाहत्यांसोबत ही आनंदाची बातमी शेअर केली. प्रार्थनाने तिच्या नणंदेसोबत म्हणजेच पल्लवी भिडे हिच्यासोबत मिळून एक नवीन ब्रँड लॉन्च केला आहे. 'We नारी' असं तिच्या नव्या ब्रँडचं नाव आहे. या ब्रँड अंतर्गत नवनवीन डिझायनर साड्या उपलब्ध होणार आहेत. 

"आजपर्यंत प्रार्थना बेहरे म्हटलं की मुलगी, बायको, सून, अक्टर, डान्सर, रिपोर्टर म्हणून ओळखली जात होते. या पदव्या मला मिळाल्या. पण, ज्या दिवसाची मी आतुरतेने वाट पाहात होते. ती पदवी आता मला मी एक खूप छान गोष्ट लॉन्च करणार आहे त्याच्यानंतर मिळणार आहे. मी एका छोट्याश्या बिझनेसमध्ये पदार्पण करतीये. त्यासाठी मला तुमच्या सगळ्यांचासपोर्ट हवाय. माझ्या बिझनेसचं नाव आहे वी नारी.. मी आणि माझ्या नणंदेने मिळून हा ब्रँड सुरु केला आहे. या ब्रँडवर सध्या साड्या अव्हेलेबल आहेत.  नवरात्रीच्या नऊ रंगाच्या साड्या सध्या  आम्ही तुमच्यासमोर रिव्हिल करणार आहोत", असं म्हणत प्रार्थनाने एक व्हिडीओ शेअर केला. सोबतच तिच्या ब्रँडची माहिती दिली.

दरम्यान, नव्या ब्रँडची माहिती दिल्यानंतर प्रार्थनाने लगेगच काही नवीन पोस्ट शेअर केल्या आहेत. यातून तिने तिच्या ब्रँडच्या साड्यांची झलक दाखवली आहे. 

टॅग्स :सेलिब्रिटीटेलिव्हिजनसिनेमा