Join us
Daily Top 2Weekly Top 5

जेव्हा मी काडीपैलवान होते...! तुफान व्हायरल होतोय प्राजक्ता माळीचा हा थ्रोबॅक व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2021 16:25 IST

व्हिडीओ बालपणीचा आहे. होय, प्राजक्ताच्याच भाषेत सांगायचे तर ती काडीपैलवान होते, अगदी त्यावेळचा.

ठळक मुद्देछोटा पडदा असो किंवा रुपेरी पडदा प्राजक्ताच्या अभिनयावर रसिक फिदा आहेत. मालिका, नाटक आणि सिनेमा अशा वेगवेगळ्या माध्यमांमध्ये प्राजक्ताने विविध भूमिका साकारल्या आहेत.

छोटा पडदा असो किंवा रुपेरी पडदा प्राजक्ता माळीच्या अभिनयावर रसिक फिदा आहेत. सहजसुंदर अभिनय, घायाळ करणारे सौंदर्य, दिलकश अदा आणि लक्षवेधी स्टाईल यामुळे प्राजक्ता अल्पावधीतच रसिकांची आवडती अभिनेत्री बनलीये.प्राजक्ता सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. चित्रीकरणाच्यावेळेसचे फोटो, व्हॅकेशनचे फोटो प्राजक्ता सोशल मीडियावर पोस्ट करत असते. तूर्तास प्राजक्ताने एक थ्रोबॅक व्हिडीओ शेअर केला आहे आणि हा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होतोय.

व्हिडीओ बालपणीचा आहे. होय, प्राजक्ताच्याच भाषेत सांगायचे तर ती काडीपैलवान होते, अगदी त्यावेळचा. या व्हिडीओत चिमुकली प्राजक्ता ‘देवदास’ या चित्रपटातील ‘डोला रे डोला’ या गाण्यावर नृत्य करताना दिसतेय.‘जेव्हा मी काडीपैलवान होते आणि बघून हुबेबुब नाचायचा प्रयत्न करायचे. अगदी कॉपी पेस्ट केलाय नाच. असो, पण मज्जा यायची,’ अशा मजेदार कॅप्शनसह तिने हा व्हिडीओ शेअर केला आहे.  

छोटा पडदा असो किंवा रुपेरी पडदा प्राजक्ताच्या अभिनयावर रसिक फिदा आहेत. मालिका, नाटक आणि सिनेमा अशा वेगवेगळ्या माध्यमांमध्ये प्राजक्ताने विविध भूमिका साकारल्या आहेत.    ‘जुळून येती रेशीमगाठी’ या मालिकेमुळे तिला चांगलीच लोकप्रियता मिळाली. तिने यानंतर हम्पी, डोक्याला शॉट यांसारख्या चित्रपटात खूप चांगल्या भूमिका साकारल्या. सध्या प्राजक्ता छोट्या पडद्यावरील कॉमेडी शो ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’चे सूत्रसंचालन करताना दिसते आहे. 2011 साली ‘सुवासिनी’ या मालिकेतून प्राजक्ताने छोट्या पडद्यावर पदार्पण केले होते.

टॅग्स :प्राजक्ता माळी