Join us

Prajakta Mali : घरच्या लग्नात प्राजूचीच हवा..., प्राजक्ता माळीनं शेअर केले भावाच्या लग्नाचे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2022 17:28 IST

Prajakta Mali : अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या घरी नुकताच एक लग्नसोहळा पार पडला. होय, चुलत भावाच्या लग्नात प्राजूचा थाट पाहण्यासारखा होता...

अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या (Prajakta Mali ) घरी नुकताच एक लग्नसोहळा पार पडला. होय, चुलत भावाच्या लग्नात प्राजूचा थाट पाहण्यासारखा होता. या लग्नसोहळ्याचे फोटो पाहण्यास चाहते उत्सुक असणारच. तर प्राजूने लग्नसोहळ्याचे खास फोटो शेअर केले आहेत.

भावाच्या लग्नात प्राजक्ताने हिरव्या रंगाची नऊवारी साडी परिधान केली होती. ही साडी आणि याला साजेसे मराठी दागिने तर हवेच. यासाठी तिने जंग जंग पछाडलं. शिवलेली नऊवारी तिला नको होती. तिने नऊवारी नेसायची ठरवली आणि दागिने थेट कोल्हापुरातून आणले. तेव्हा कुठे जाऊन तिचा लुक साधला अन् प्राजूचा आत्माही सुखावला.

या लग्नाच्या निमित्ताने प्राजक्ता माळीच्या कुटुंबाच्या चार पिढ्या एकत्र आल्यात. धम्माल मस्ती मज्जा झाली.गोतावळा जमल्यावर बरं वाटतंच. पण नव्या पाहुणीचं स्वागत म्हटल्यावर आनंद द्विगुणित होतं. प्राजक्ताने तिच्या कुटुंबातील नव्या पाहुणीचं अर्थात नवी वहिनी सायलीचं धडाक्यात स्वागत केलं. त्यांच्यासोबत मस्तपैकी फोटोसेशन केलं. हे लग्नातले  फोटो तिने शेअर केलेत. या फोटोला तिने दिलेल्या कॅप्शनही सर्वांचं लक्ष वेधलं. ‘ गोतवळा जमल्यावर बरं वाटतं. नव्या पाहुणीचं कुटुंबात स्वागत आहे,’ असं तिने लिहिलं. आता तुम्ही लग्न कधी करताय? हे विचारू नका अशी गोड विनंतीही तिने सरतेशेवटी केली.

तिच्या या पोस्टवर चाहत्यांनी भन्नाट कमेंट्स केल्या आहेत. सगळे फोटोग्राफर फक्त तुमचेच फोटो काढत असणार, असं एका चाहत्याने लिहिलं आहे. आम्हाला बोलवलं नाहीस लग्नाला, असंही एका चाहत्याने लिहिलं आहे. लग्न करायला पाहिजे आता तू पण..., असं एका चाहत्याने तिला सुचवलं आहे. 

टॅग्स :प्राजक्ता माळीमराठी अभिनेता