Join us

आपला भूतकाळ शेअर करावा का? पूजा सावंत म्हणाली, 'मी सिद्धेशला सांगायचा प्रयत्न केला पण...'

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2024 17:41 IST

पूजाने एका मुलाखतीत पार्टनरसोबत आपला भूतकाळ शेअर करावा का याविषयी सांगितलं. 

मराठी अभिनेत्री पूजा सावंतने (Pooja Sawant) काही दिवसांपूर्वी चाहत्यांना साखरपुडा झाल्याचा सुखद धक्का दिला. सिद्धेश चव्हाणसोबत ती लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. पूजाने सिद्धेशसोबतचे रोमँटिक फोटो शेअर करत ही बातमी सर्वांना दिली. पूजा आणि सिद्धेशची जोडी किती छान दिसत आहे असं म्हणत तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला. नुकतंच पूजाने एका मुलाखतीत पार्टनरसोबत आपला भूतकाळ शेअर करावा का याविषयी सांगितलं. 

अभिनेत्री पूजा सावंतने तिच्या सौंदर्याने आणि अभिनयाने चाहत्यांच्या मनावर छाप पाडली. पूजाने अचानक साखरपुड्याची बातमी दिली तेव्हा सगळ्यांनाच धक्का बसला. 'रेडिओ सिटी मराठी'ला दिलेल्या मुलाखतीत तिला भूतकाळ पार्टनरसोबत शेअर करावा का असा प्रश्न विचारण्यात आला. यावर ती म्हणाली, "एकमेकांवर तितका विश्वास असावा. जर तो विश्वास घट्ट आणि पक्का असेल तर भूतकाळ शेअर करावा. आपण भूतकाळ मागे ठेवून नवीन आयुष्य सुरु करत असतो. कारण तुम्हाला माहितही नसतं की कधी केव्हा कसा तुमचा भूतकाळ परत तुमच्यासमोर येईल.माझ्याही घरी असं होतं की जे काही आहे ते सगळं बोलून घे. पण सिद्धेश माझा भूतकाळ जाणून घेण्यात कधीच इंटरेस्टेड नव्हता. तो मला म्हणाला की, 'मला तू हवी आहेस, याच्यापुढचं आयुष्य मला तुझ्यासोबत घालवायचं आहे. मला काहीही ऐकायचं नाहीए सांगूही नकोस."

ती पुढे म्हणाली, "मी बऱ्याचदा त्याला सांगण्याचा प्रयत्न केला पण तो म्हणाला की मला माहित आहे हे कसं हँडल करायचं नको सांगूस.' भूतकाळ सांगणं महत्वाचं आहे. पण समोरचा तुमच्यावर भरपूर प्रेम करत असेल तुमच्या भूतकाळापेक्षा जास्त प्रेम करत असेल तर मग काही हरकत नाही नका सांगू. तुम्ही त्या माणसाला तेव्हाच ओळखू शकता जेव्हा तो सगळं बाजूला ठेवून तुमच्यावर विश्वास ठेवतो, तुमच्यावर प्रेम करतो. म्हणून मला सुरुवातीपासूनच सिद्धेशला सगळं सांगायचं होतं."

अभिनेत्री पूजा सावंतचं नाव याआधी अभिनेता वैभव तत्ववादी, भूषण प्रधान यांच्यासोबत जोडलं गेलं. मात्र ते दोघंही तिचे बेस्ट फ्रेंड्स असल्याचं तिने स्पष्ट केलं. यानंतरही पूजा काही काळ रिलेशनशिपमध्ये होती. नंतर तिचा ब्रेकअप झाला. यानंतर काहीच दिवसांपूर्वी तिने सिद्धेश चव्हाणची ओळख चाहत्यांना करुन दिली. सिद्धेश ऑस्ट्रेलियात राहत असून एका कंपनीत कार्यरत आहे. 

टॅग्स :पूजा सावंतमराठी अभिनेतारिलेशनशिप