Join us
Daily Top 2Weekly Top 5

"सकाळी ५.३० ला उठते, २ लीटर पाणी पिऊन मग..."; अभिनेत्री पूजा सावंतने सांगितलं तेजस्वी त्वचेचं रहस्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2026 16:03 IST

कलरफुल अभिनेत्री पूजा सावंत स्वत: ला मेंटेन कशी ठेवते? काय आहे तेजस्वी त्वचेचं रहस्य? म्हणाली...

Pooja Sawant: मराठी चित्रपट सृष्टीतील कलरफुल अभिनेत्री म्हणून पूजा सावंतला ओळखलं जातं.  ‘क्षणभर विश्रांती’ या चित्रपटातून तिने इंडस्ट्रीत पदार्पण केलं.त्यानंतर ‘सतरंगी रे, सांगतो ऐका, नीलकंठ मास्तर, पोस्टर बॉईज’ अशा अनेक चित्रपटांमध्ये अनेक वेगवेगळ्या भूमिका निभावल्या. आपल्या अभिनयामुळे प्रेक्षकांची मनं जिंकणारी ही नायिका तिच्या सौंदर्याने देखील अनेकांना घायाळ करते. लवकरच ती ‘सालबर्डी’ सिनेमातून चाहत्यांच्या भेटीला येत आहे. मात्र, आपल्या कामाच्या बिझी शेड्यूलमधून पूजा तिचा फिटनेस आणि त्वचेची कशी काळजी घेते. याबद्दल एका मुलाखतीत तिने खुलासा केला आहे.

नुकतीच पूजाने लोकमत सखीला मुलाखत दिली. यादरम्यान, तुझं स्किन केअर रुटीन काय असतं? असं तिला विचारण्यात आलं. त्याबद्दल सांगताना पूजा म्हणाली, "लहानपणापासून माझी स्किन कधीच क्लिअर नव्हती. मला नेहमी मुरुमांचा किंवा ड्रायनेसचा त्रास असायचा.त्यामुळे त्वचेला छान आणि टवटवीत ठेवण्यासाठी मला प्रयत्न करावे लागले.आता माझी त्वचा चांगली दिसतेय त्यामागे खूप मेहनत आहे. बऱ्याच गोष्टींवर नियंत्रण ठेवावं लागतं. एक रुटिन आहे, ते मला पाळावं लागतं."

मग पुढे पूजा म्हणाली,"कोणत्याही कॉस्मेटिक प्रोडक्ट्सपेक्षा काही सवयी आहेत, ज्या मी अत्यंत निष्ठेने पाळते. एक म्हणजे दिवसाच्या पहिल्या सत्रात मी काहीही करून दोन लिटर पाणी संपवते. माझी सकाळ खूप लवकर होते. मी सकाळी साडेपाचला उठते.  पहाटेचा वर्कआऊट माझ्या इतका अंगवळणी पडला आहे की, अख्य़ा दिवसात वर्कआऊट करता येत नाही. जो काही मला व्यायाम करायचो असेल तर मी पहाटेच असतो. आणि सूर्यादयापर्यंत माझा वर्कआऊट संपलेला असतो. जेव्हा सुर्योदय होतो तेव्हा जी कोवळी किरणं असतात ती मी स्किनवर घेते. त्यामुळे माझ्या त्वचेला डी जीवनसत्व मिळते. माझं स्किन रुटिन हे तिथपासून सुरु होतं."

उन्हाळ्यात तुझं स्किन रुटिन काय असतं?

यावर बोलताना पूजा म्हणाली, "उन्हाळ्यात भरपूर पाणी प्या. फक्त आता उन्हाळ्यात मी पाण्यात चार पुदिन्याची पानं टाकते, अर्धा लिंबू पिळा. आल्याचा छोटा तुकडा चेचून त्यामध्ये टाका. ते डिटॉक्स वॉटर मी कायम माझ्यासोबत ठेवते. त्याची मला खूप मदत होते. " त्याचबरोबर मुलाखती पूजाने उन्हाळ्यात टॅनिग कशी कमी करायची? याच्या काही टिप्स देखील दिल्या आहेत. 

टॅग्स :पूजा सावंतमराठी चित्रपटसेलिब्रिटीफिटनेस टिप्स