Join us
Daily Top 2Weekly Top 5

पूजा सावंतच्या होणाऱ्या सासूबाई कशा आहेत? अभिनेत्री म्हणते, "माझ्या आईवडिलांप्रमाणेच त्यादेखील..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2023 18:35 IST

"मी माझ्या सासूबाईंच्या प्रेमात आहे. कारण...", होणाऱ्या सासूबाईंबद्दल पूजा सावंतचं वक्तव्य

'दगडी चाळ', 'क्षणभर विश्रांती', 'भेटली तू पुन्हा', 'लपाछपी', 'विजेता', 'वृंदावन' अशा सुपरहिट मराठी सिनेमांतून अभिनयाचा ठसा उमटवून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे पूजा सावंत. अभिनयाबरोबच सौंदर्याने चाहत्यांना भुरळ पाडणाऱ्या पूजाने काही दिवसांपू्र्वीच प्रेमाची कबुली दिली. सिद्धेश चव्हाणबरोबर साखरपुडा केल्याचं सांगत पूजाने तिच्या मिस्ट्री मॅनचं गुपितंही उघडलं. त्यानंतर पूजाची लव्हस्टोरी आणि तिच्या लग्नाबद्दल चर्चा रंगल्या होत्या. 'लोकमत फिल्मी'ला दिलेल्या मुलाखतीत पूजाने याबाबत भाष्य केलं. 

पूजाने सिद्धेशबरोबरच पहिली भेट ते त्याच्या कुटुंबीयांबाबतही 'लोकमत फिल्मी'च्या मुलाखतीत उघडपणे भाष्य केलं. या मुलाखतीत तिने तिच्या होणाऱ्या सासूबाईंबद्दलही सांगितलं. पूजा म्हणाली, "मी माझ्या सासूबाईंच्या प्रेमात आहे. कारण, त्या इतक्या क्यूट आहेत...माझे सिनेमे कोणते आहेत, मी काय काय काम केलंय...हे सगळं त्यांना माहीत आहे. सिद्धेशपेक्षा त्याच्या आईवडिलांना याबाबत जास्त माहिती आहे. जसे माझे आईबाबा मला पाठिंबा देतात तसंच तेदेखील मला सपोर्ट करतात. त्यांना माझा अभिमान आहे. आणि हे खूप महत्त्वाचं आहे. कारण, तुम्ही लग्न फक्त एका व्यक्तीबरोबर करत नाही...तर संपूर्ण कुटुंब यामध्ये असतं. मी त्याच्या कुटुंबीयांबरोबर राहिलेही आहे. सिद्धेशचे आईबाबा, त्याचा लहान भाऊ, त्याची बायको आम्ही सगळे एकत्र राहिलो होतो. मी कुठल्या दुसऱ्याच फॅमिलीबरोबर राहिले, असं मला वाटलंच नाही." 

पूजाचा होणारा नवरा सिद्धेश अभिनय क्षेत्रातील नाही. तो कामानिमित्त ऑस्ट्रेलियात असतो. पूजाने त्याच्याबरोबरचे अनेक फोटो शेअर केले आहेत. प्रेमाची कबुली दिल्यानंतर पूजाच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आलं आहे. 

टॅग्स :पूजा सावंतमराठी अभिनेतासिनेमासेलिब्रिटी