Join us

पूजा सावंतच्या 'मिस्ट्री मॅन'चं गुपित अखेर उलगडलं; कोण आहे तो... जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2023 11:07 IST

अभिनेत्री पूजा सावंतने काल साखरपुड्याचे काही फोटो शेअर केले होते

अभिनेत्री पूजा सावंतने (Pooja Sawant) काल चाहत्यांना साखरपुडा झाल्याची गुडन्यूज दिली आणि सर्वांना सुखद धक्का बसला. समुद्रकिनाऱ्यावरील रोमँटिक फोटो शेअर करत तिने ही ही न्यूज शेअर केली.  मात्र तो मिस्ट्री मॅन नेमका कोण आहे असा प्रश्न सर्वांना पडला होता. कारण फोटोंमध्ये पूजाने त्याचा चेहराच लपवला होता. अखेर आज पूजाने मिस्ट्री मॅनचा चेहरा दाखवला आहे. सिद्धेश चव्हाणसोबत (Siddesh Chavan) पूजा एंगेज झाली आहे.

पूजा सावंत अनेक वर्षांपासून मराठी इंडस्ट्रीत कार्यरत आहे. अभिनेता वैभव तत्ववादी आणि भूषण प्रधानसोबत तिच्या मैत्रीची नेहमीच चर्चा असते. आता पूजाने अचानक साखरपुड्याची बातमी देत सर्वांनाच धक्का दिला. पूजाने नुकतेच दोन फोटो शेअर केले आहेत. यामध्ये तिचा होणारा नवरा सिद्धेश चव्हाणचा चेहरा अखेर समोर आला आहे. तसंच पूजाच्या बोटातील अंगठीनेही लक्ष वेधून घेतलंय. "तुझ्यासोबत प्रेमाच्या या नवीन प्रवासाची सुरुवात करण्यासाठी खूप आतुर आहे' एन्गेज्ड इन लव्ह" असं कॅप्शन तिने या फोटोंना दिलं आहे. 

पूजाने सिद्धेशसोबतचं रिलेशनशिप नेहमीच गुपित ठेवलं. तिच्या प्रेमाविषयी कोणालाच कानोकान खबरही लागली नाही. मात्र इंडस्ट्रीतील तिच्या जवळच्या मित्रमैत्रिणींना याविषयी माहित होतं. काल पूजाने पोस्ट केलेल्या फोटोंवर सिद्धार्थ चांदेकरच्या कमेंटने लक्ष वेधलं होतं. 'अँड द डिझ्नी फिल्म बिगिन्स' असं त्याने लिहिलं होतं. पूजाचा होणारा नवरा सिद्धेश चव्हाण डिझ्नी कंपनीत असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. तसंच तो परदेशात राहतो या चर्चांनाही उधाण आलं आहे. आज पूजाने फक्त नाव आणि फोटोवरुन पडदा उठवला आहे. तरी सिद्धेश नेमकं करतो काय, त्यांची लव्हस्टोरी नक्की कशी सुरु झाली हे अजून गुलदस्त्यातच आहे.

टॅग्स :पूजा सावंतमराठी अभिनेतालग्न