Join us
Daily Top 2Weekly Top 5

जरीकाठची साडी अन् दोन गुलाब... 'या' मराठमोळ्या अभिनेत्रीला ओळखलंत का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2023 16:34 IST

ही केवळ अभिनेत्री नसून उत्तम गायिकाही आहे.

मराठी अभिनेत्रींच्या श्रृंगाराची आणि त्यांच्या सौंदर्याची जेवढी स्तुती करावी ती कमीच आहे. त्यातच पारंपारिक साडीत त्यांचं सौंदर्य आणखीच खुलून दिसतं. आज गुढीपाडव्यानिमित्त अनेक कलाकारांनी पारंपारिक वेशभूषेत गुढी उभारतानाचे फोटो पोस्ट केले आहेत. दरम्यान एका अभिनेत्रीने गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देताना पाठमोरा फोटो पोस्ट केला आहे. ओळखलंत का कोण आहे ही अभिनेत्री?

हिरवा ब्लाऊज, पांढरी साडी मोकळे केस, गुलाबाचं फुल, अशा लुकमध्ये अभिनेत्रीने पाठमोरा फोटो पोस्ट केला आहे. ही अभिनेत्री आहे सर्वांची लाडकी पराजू म्हणजेच केतकी माटेगावकर (Ketaki Mategaonkar). आगामी सिनेमातील तिचा हा लुक असून लवकरच असं कॅप्शनही तिने दिलं आहे. मात्र या लुकबद्दल जास्त माहिती केतकीने दिलेली नाही.

केतकी सध्या अनेक प्रोजेक्ट्समध्ये व्यस्त आहे. प्रसाद ओक सोबत 'मीरा' या सिनेमात केतकीची भूमिका आहे. सिनेमाचे शूट नुकतेच पार पडले आहे. याशिवाय केतकी काही दिवसांपूर्वीच स्वीत्झर्लंड वरुन परतली आहे. तिथे ती तिच्या आगामी सिनेमाच्या शूटसाठी गेली होती. मात्र हा सिनेमा कोणता याचा खुलासा अद्याप केतकीने केलेला नाही.

टॅग्स :केतकी माटेगावकरमराठी अभिनेतासोशल मीडिया