Join us

'आमचीच लायकी नाही!..'; पोस्ट शेअर करत हेमांगी कवीने मागितली माफी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2022 15:30 IST

Hemangi kavi: हेमांगीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने बाबासाहेबांची माफी मागितली आहे.

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे हेमांगी कवी (Hemangi kavi). उत्तम अभिनयासह हेमांगी तिच्या स्पष्टवक्तेपणा आणि निर्भीडपणे व्यक्त होण्यामुळे कायम चर्चेत येत असते. समाजात कोणतीही घटना घडली तरी हेमांगी त्यावर भाष्य करते. यावेळी तिने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने बाबासाहेबांची माफी मागितली आहे. इतकंच नाही तर आमची लायकी नाही, असंही तिने म्हटलं आहे. त्यामुळे सध्या तिची ही पोस्ट चर्चेत येत आहे.

आज संपूर्ण देशात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. अनेकांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत या दिनाच्या शुभेच्छाही दिल्या आहेत. मात्र, हेमांगीची पोस्ट नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे.

‘मानवी हक्क आणि समाजहितासाठी संविधानात तुम्ही सांगितलेल्या गोष्टी अमलात आणायची आमचीच लायकी नाही! जमलं तर माफ करा बाबासाहेब! #जयभीम #jaybhim #डॉबाबासाहेबआंबेडकर #DrBabasahebAmbedkar #महामानव’, अशी पोस्ट हेमांगीने शेअर केली आहे.

दरम्यान, हेमांगी सोशल मीडियावर कायम परखडपणे तिची मतं मांडत असते. यात अनेकदा तिला ट्रोलदेखील व्हावं लागतं. मात्र, तरीदेखील ती ट्रोलर्सकडे दुर्लक्ष करत तिची मतं मांडते. हेमांगी लवकरच ‘भारत माझा देश आहे’ या मराठी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तसंच सध्या ती ‘लेक माझी दुर्गा’ या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहे.

टॅग्स :डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीहेमांगी कवीसेलिब्रिटीसिनेमाटेलिव्हिजन