Join us
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई इंडियन्सच्या पराभवानंतर मराठी अभिनेत्रीचा हार्दिकला टोला, म्हणाली, "भाई पांड्या..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2024 13:50 IST

कालच्या सामन्यानंतर सोशल मीडियावर हार्दिकची केवळ खिल्ली उडवली जात आहे.

आयपीएल(IPL)चा हंगाम सुरु झाला आहे. क्रिकेट प्रेमींचा हा जणू सणच आला आहे. काल मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) विरुद्ध गुजरात टायटन्स (Gujrat Titans) असा सामना झाला. दरवर्षीप्रमाणे मुंबई इंडियन्स पहिली मॅच हरली. तसंच यावेळी हार्दिक पांड्या कर्णधार असल्याने प्रेक्षकांमधून त्याला जबरदस्त ट्रोलिंग सहन करावं लागलं. हार्दिक गेल्या वर्षी गुजरात संघाचा कर्णधार होता. त्याने ट्रॉफीही जिंकली होती. यंदा त्याने पुन्हा मुंबई संघात वापसी केली. कालच्या सामन्यानंतर मराठी अभिनेत्रीने एक पोस्ट करत हार्दिकला चांगलाच टोला लगावला आहे.

कालच्या सामन्यानंतर सोशल मीडियावर हार्दिकची केवळ खिल्ली उडवली जात आहे. तर मीम्सही व्हायरल होत आहेत. तसंच सर्वांच्या मनातील कॅप्टन रोहित शर्मासाठी सहानुभूती व्यक्त केली जात आहे.'नाळ' फेम अभिनेत्री दीप्ती देवीने इन्स्टाग्राम स्टोरी शेअर केली आहे. यामध्ये ती लिहिते, "भाई पांड्या तू दिल से अभी तर गुजरात के साथ ही है. (भाऊ पांड्या तू मनाने अजूनही गुजरातसोबतच आहेस). " 

दीप्ती देवी मराठीतील प्रतिभावान अभिनेत्री आहे. तिने नागराज मंजुळेंच्या 'नाळ', 'घर बंदुक बिरयानी' सिनेमात भूमिका साकारली होती. 'मला सासू हवी' मालिकेमुळे ती घराघरात पोहोचली होती. 

टॅग्स :दीप्ती देवीमराठी अभिनेताहार्दिक पांड्याआयपीएल २०२४सोशल मीडिया