Join us

"हा चित्रपट अजून खास आहे कारण माझा मुलगा रुआन.."; 'झापुक झुपूक'बद्दल दिपाली पानसरेची पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2025 12:35 IST

"बोलायला खूप आहे पण...", 'झापुक झुपूक' सिनेमाबद्दल दिपाली पानसरेची पोस्ट; म्हणाली- "सेटवर जाताना..."

Deepali Pansare Post: 'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या पर्वाचा विजेता ठरलेल्या सूरज चव्हाणने अभिनय क्षेत्रात एन्ट्री घेतली आहे. सध्या सूरज चव्हाण त्याच्या 'झापुक झुपूक' सिनेमामुळे चर्चेत आला आहे. केदार शिंदे दिग्दर्शित हा बहुप्रतीक्षीत चित्रपट आज प्रदर्शित झाला आहे. त्यामुळे चाहत्यांची उत्सुकता कमालीची वाढल्याचं दिसतंय. दरम्यान, या मल्टिस्टारर चित्रपटात जुई भागवत, इंद्रनील कामत, हेमंत फरांदे,पायल जाधव,दीपाली पानसरे, पुष्कराज चिरपुटकर, मिलिंद गवळी अशी तगडे कलाकार आहेत. अशातच या चित्रपटाच्या निमित्ताने अभिनेत्री दिपाली पानसरेने सोशल मीडियावर शेअर केलेली पोस्ट चर्चेत आहे. 

नुकतीच दिपाली पानसरेने 'झापुक झुपूक' चित्रपटाबद्दल सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टद्वारे तिने चित्रपटात काम करण्याचा तिच्या अनुभवांविषयी सांगितलं आहे. त्यामध्ये तिने लिहिलंय, "झापूक झुपूक... तसा माझा चौथा चित्रपट ते पण तब्बल १२ ते १५ वर्षांनंतर. हा चित्रपट अनेक कारणासाठी खास आहे. सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे या चित्रपटाच्या निमित्ताने केदार शिंदे यांच्या बरोबर काम करण्याची इच्छा पूर्ण झाली. खूप आधीपासून केदार सरांबरोबर काम करण्याची इच्छा मनात होती. पण घडून येत नव्हतं. पण अचानक एक मराठी मालिका आणि एक हिंदी मालिका एका वेळी करत असताना या चित्रपटासाठी मला फोन आला. आणि सगळं सहज जमून आलं. सेटवर जाताना दरवेळी असते तशीच धाकधुक होती. पण सरांनी दिलेल्या आत्मविश्वासामुळे सगळं शक्य झालं. हा चित्रपट अजून खास आहे कारण माझा मुलगा रुआन झाल्यापासून मी फक्त मालिका करते आहे. त्यामुळे आता मला चित्रपटात पाहताना तो खूप खुश होतो आहे. झापूक झुपूकच्या रिलीजसाठी तो जास्त excited आहे."

त्यानंतर दिपालीने म्हटलंय, "अजून एक कारण म्हणजे माझे costar मिलिंद गवळी. पुन्हा एकदा स्क्रीन शेअर करतो आहे. आई कुठे काय करते या मालिकेत आमच्या एकत्र कामाचा प्रवास मधेच थांबला होता. त्याला कारणही तसं होतं. पण आम्ही पुन्हा एकदा एकत्र काम केलंय.आपल्याला कधी चांगल्या चित्रपटात संधी मिळेल का? असा विचार नेहमी यायचा. पण झापूक झुपूक केल्यानंतर यामध्ये बदल झाला आहे. मला ही चांगले चित्रपट मिळणार ही positivity आली आहे. बोलायला खूप आहे पण सध्या एवढंच.तर, वृंदा पंजाबराव मोहिते येतीये तुम्हाला भेटायला उद्या पासून म्हणजेच २५ एप्रिल पासून तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात. नवा प्रयत्न आहे. गोड मानून घ्या. प्रतिक्रिया नक्की कळवा." अशी पोस्ट लिहून अभिनेत्रीने शेअर केली आहे. 

टॅग्स :केदार शिंदेमराठी चित्रपटसेलिब्रिटी