Join us
Daily Top 2Weekly Top 5

"काही दिवसांपूर्वी स्वामींच्या तारकात झळकण्याची संधी मिळाली तेव्हाच..."; भाग्यश्री मोटेचा अनुभव

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2024 10:34 IST

मराठमोळी अभिनेत्री भाग्यश्री मोटेने सोशल मीडियावर ती अक्कलकोटला गेल्यावर तिला आलेला अनुभव शेअर केलाय (bhagyashree mote, shree swami samartha)

मराठमोळी अभिनेत्री भाग्यश्री मोटे ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री. भाग्यश्रीने मराठी-हिंदी सिनेमांसोबतच दाक्षिणात्य सिनेमांमध्येही काम केलंय. भाग्यश्री सोशल मीडियावर तिच्या विविध पोस्टच्या माध्यमातून चर्चेत असते. भाग्यश्रीने काही दिवसांपूर्वी स्वामी समर्थांच्या तारक मंत्रावर आधारीत व्हिडीओ सॉंगमध्ये काम केलं. यानंतर भाग्यश्रीला अक्कलकोटला जाण्याचा योग आला. अक्कलकोटला गेल्यावर भाग्यश्रीने तिचा अनुभव शेअर केलाय. 

 अक्कलकोटला गेल्यावर भाग्यश्रीने सांगितला अनुभव

भाग्यश्रीने अक्कलकोट स्वामी समर्थ मंदिरातील फोटो शेअर केलेत. हे फोटो शेअर करुन भाग्यश्री लिहिते, "कित्येकदा ठरवलं अक्कलकोटला जायचं पण काही ना काही कारणास्तव जाणं होत नव्हता. शेवटी ठरवलं स्वामींचं बोलावणं येईल तेव्हाच जाईल आणि म्हणतात स्वामी बोलावतात तुम्हाला. काही दिवसांपूर्वी स्वामींच्या तारकात झळकण्याची संधी मिळाली तेव्हाच कळलं स्वामींचा बोलावणं आलं आहे. मग जाणं अनिवार्य होतं."

भाग्यश्री मोटेचं वर्कफ्रंट

भाग्यश्री मोटेने अनेक मराठी सिनेमा, मालिका आणि जाहिरातींमध्ये काम केलंय. भाग्यश्रीने 'देवो के दे महादेव' आणि 'सिया के राम' या पौराणिक मालिकांमध्ये अभिनय केलाय. याशिवाय 'गणपती बाप्पा मोरया' या मराठी मालिकेत तिने माता पार्वतीची भूमिका साकारली होती. भाग्यश्रीने स्कॅम फेम अभिनेता प्रतीक गांधीसोबत 'भवई' सिनेमात काम केलंय. भाग्यश्री मोटेच्या नवीन प्रोजेक्टची तिचे चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.

टॅग्स :भाग्यश्री मोटेअक्कलकोटमराठीमराठी अभिनेता