Join us

'त्यांना जग बघायला पाठवतोय'; सिद्धार्थने अरेंज केली आई-वडिलांसाठी पहिली फॉरेन टूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2023 15:49 IST

Siddharth jadhav: पोराने केलं आई-बापाच्या कष्टाचं चीज; आई-वडिलांना विदेशात पाठवताना सिद्धार्थ झाला भावूक

'आपला सिद्धू' असं म्हणत प्रत्येक प्रेक्षकाला जवळचा वाटणारा अभिनेता म्हणजे सिद्धार्थ जाधव. मराठीसह हिंदी सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाचं नाणं वाजवणारा सिद्धार्थ आज लोकप्रिय अभिनेता म्हणून ओळखला जातो. विशेष म्हणजे अमाप प्रसिद्धी, लोकप्रियता मिळवल्यानंतरही त्याचे पाय जमिनीवर आहेत. त्यामुळे तो चाहत्यांमध्ये विशेष लोकप्रिय आले. नुकतीच त्याने एक पोस्ट शेअर केली आहे. यात त्याचे आई-वडील विदेश दौऱ्यासाठी निघाल्याचं त्याने म्हटलं आहे.This is the "moment " ... आई बाबांचा पहिला परदेश दौरा...माझ्यासाठी हा क्षण  किती महत्त्वाचा आहे, हे मी शब्दात नाही सांगू शकत...त्यांच्या आशीर्वादाने "मी जग बघायला फिरलो " आणि आज  त्यांच्याच आशीर्वादाने "मी त्यांना जग बघायला पाठवतोय..." त्यातला आज त्यांचा हा "पहिला प्रवास..." माझ्या शाळेतल्या पहिल्या सहलीपासून ते आतापर्यंत लंडनला शूटला जाईपर्यंत जी excitment ,आनंद, त्यांना असायचा तशीच किंवा त्यापेक्षा जास्त excitment,आनंद आज मला वाटतोय....ते मला जे नेहमी सांगायचे तेच आज मी त्यांना सांगतोय..तुम्ही मज्जा करा.. माझी काळजी नको..मी आहे तुमच्यासोबत..... कायम....सिध्दू ...., असं कॅप्शन देत सिद्धार्थने त्याच्या आई-वडिलांचा फोटो शेअर केला आहे.

दरम्यान, सिद्धार्थ सोशल मीडियावर कमालीचा सक्रीय आहे. त्यामुळे तो कायम चाहत्यांसोबत त्याच्या जीवनातील लहानमोठे किस्से, घटना शेअर करत असतो. परंतु, यावेळी त्याने आईवडिलांसाठी ही टूर अरेंज केल्यामुळे तो खूपच भावूक झाला. त्यामुळे त्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून भावनांना वाट मोकळी केली. त्याची ही पोस्ट पाहिल्यावर अनेकांनी त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. 

टॅग्स :सिद्धार्थ जाधवसेलिब्रिटीसिनेमामराठी अभिनेता