Join us
Daily Top 2Weekly Top 5

First photo: मिस्टर & मिसेस चांदेकरांचं स्वप्न पूर्ण; सिद्धार्थ-मितालीने केला नव्या घरात प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2022 11:45 IST

Siddharth chandekar: काही दिवसांपूर्वी सिद्धार्थ-मितालीने एक पोस्ट शेअर करत नवीन घर घेतल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर, आता या दोघांनी नव्या घरात गृहप्रवेश केला असून नुकतीच घराची वास्तुशांती केली आहे.

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय आणि कायम चर्चेत राहणारी जोडी म्हणजे मिताली मयेकर (mitali mayekar) आणि सिद्धार्थ चांदेकर (siddharth chandekar). अनेकदा हे दोघ त्यांच्या अभिनयापेक्षा त्यांच्यात असलेल्या उत्तम केमिस्ट्रीमुळे चर्चेत असतात. २०२१ मध्ये सिद्धार्थ-मितालीने मोठ्या दणक्यात लग्न केलं. त्यानंतर अवघ्या वर्षभरानंतर या जोडीने त्यांच्या नव्या घरात गृहप्रवेश केला आहे. या नव्या घराचे काही फोटो सिद्धार्थने शेअर केले आहे.

काही दिवसांपूर्वी सिद्धार्थ-मितालीने एक पोस्ट शेअर करत नवीन घर घेतल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर, आता या दोघांनी नव्या घरात गृहप्रवेश केला असून नुकतीच घराची वास्तुशांती केली आहे. सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या सिद्धार्थने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये वास्तुशांतीचा एक सुरेख फोटो शेअर केला आहे.

दरम्यान, सिद्धार्थ आणि मिताली हे दोघंही या पूर्वी आरे कॉलनीमध्ये राहात असल्याचं सांगण्यात येतं. त्यामुळे नव्या घरात प्रवेश करण्यापूर्वी त्यांनी त्यांच्या जुन्या घराचे आभार मानले आहेत. या घराने खूप सांभाळून घेतलं असं म्हणत सिद्धार्थने त्याच्या जुन्या घराचा फोटो शेअर केला. सोबतच एक पोस्टही लिहिली. सध्या सिद्धार्थ आणि मितालीने नवीन घर घेतल्यामुळे त्यांच्यावर नेटकऱ्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. 

टॅग्स :सिद्धार्थ चांदेकरमिताली मयेकरसेलिब्रिटीटेलिव्हिजन