Join us
Daily Top 2Weekly Top 5

तब्बल 12 वर्षानंतर झाली संकर्षणची 'त्या' काकूंसोबत भेट; अलिबागच्या काकूंचं प्रेम पाहून भारावला अभिनेता

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2023 13:38 IST

Sankarshan karhade: संकर्षणच्या भेटीसाठी या काकूंनी अलिबाग ते अमेरिका असा पल्ला गाठला

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता म्हणजे संकर्षण कऱ्हाडे. नाटक, मालिका, सिनेमा, रिअॅलिटी शो अशा जवळपास सगळ्याच क्षेत्रामध्ये त्याचा दांडगा वावर आहे. त्यामुळे आज त्याचा मोठा चाहतावर्ग आहे. यात खासकरुन संकर्षणाच्या नाटकाच्या प्रयोगाला रसिकप्रेक्षक मोठ्या संख्यने गर्दीत करत असतात. यावेळी संकर्षणला काही चाहत्यांचा भन्नाट अनुभव येतो. हे अनुभव तो वरचेवर सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर सुद्धा करत असतो. असाच एक अनुभव त्याने नुकताच शेअर केला आहे.

सध्या संकर्षण अमेरिकेमध्ये त्याच्या नाटकाचे प्रयोग करत आहे. या प्रयोगाच्या निमित्ताने तो असंख्य चाहत्यांच्या भेटी घेत आहे. विशेष म्हणजे या नाटकाच्या निमित्ताने तब्बल १२ वर्षानंतर त्याला त्याच्या एक गोड चाहतीची भेट घेतला आली. या भेटीचा किस्सा त्याने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

“माझ्या आयुष्या. तला हा फार फार गोड क्षण…”  Please वाचा. आज अमेरिकेतला डॅल्लसचा प्रयोग जोरदार झाला.. प्रयोगानंतर एक काकू काठी टेकवत भेटायला आल्या… त्यांचं नाव “उत्तरा दिवेकर” ह्या त्याच आहेत ज्यांच्या घरी अलिबागला मी २०११ साली माझा “आम्ही सारे खवय्ये” चा पहिला भाग शूट केला होता.. योगायोगाने त्या सिजनचं नाव होतं “आई मला भूक लागलीये”.. आज मला त्या म्हणाल्या “मी माझ्या मुलाचं नाटक पहायला आले..” ईतकं भरून आलं मला …. कलाकाराला काय हवंय..? हेच .. हेच..आज १२ वर्षं झाली मी हा कार्यक्रम करतोय…. ”खवय्ये” मुळे मला अनेक कुटुंब भेटली, अनेक नाती तयार झाली आणि अशा अनेक “आई” भेटल्यात ज्या जगभरांत कुठेही राहात असल्या तरी माझी वाट पाहातायेत आणि आज “नियम व अटी लागू नाटकाच्या निमित्ताने भेट झाली … आणि हो ; आजपासून आमचा सिनेमा रिलिज होतोय .. महाराष्ट्रात.. “तीन अडकून सीताराम” चित्रपटगृहात जाउन नक्की बघा ..आहे", अशी पोस्ट संकर्षण कऱ्हाडे याने शेअर केली आहे. सोबत त्याने या काकूंसोबत छानसा फोटोही शेअर केला आहे. 

टॅग्स :नाटकसेलिब्रिटीमराठी अभिनेता