Join us

'सुशीला-सुजीत' सिनेमात एक नव्हे, दोन नव्हे तर 'इतक्या' भूमिका निभावणार प्रसाद ओक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2025 15:09 IST

मराठी अभिनेता प्रसाद ओकने आगामी सिनेमात तब्बल पाच भूमिका साकारल्या आहेत

अभिनेता प्रसाद ओक (prasad oak) हा मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेता. प्रसाद सध्या 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' शोमध्ये सहभागी होताना दिसतो. प्रसाद उत्तम अभिनेता आहे शिवाय तो एक चांगला दिग्दर्शकही आहे. प्रसादच्या आगामी 'सुशीला - सुजीत' सिनेमाची खूप उत्सुकता आहे. या सिनेमाविषयी एक खास माहिती कळतेय ती म्हणजे प्रसाद या सिनेमात एक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल पाच भूमिकांमध्ये दिसणार आहे.'सुशीला - सुजीत'मध्ये प्रसादच्या पाच भूमिका

'सुशीला - सुजीत' चित्रपटात प्रसाद करत असलेल्या तब्बल पाच भूमिका नक्की कोणत्या ? हा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे. तर प्रसाद या चित्रपटाचा कॅप्टन ऑफ द शीप म्हणजे दिग्दर्शक आहे. सोबतीला तो या चित्रपटात एक अतरंगी भूमिका साकारतोय! चित्रपटाची कथा प्रसादचीच आहे. या चित्रपटाचा प्रसाद निर्माता सुद्धा आहे आणि विशेष गोष्ट म्हणजे या चित्रपटात प्रसादने एक सुंदर गाणं देखील गायलं आहे. एवढ्या सगळ्या भूमिका आणि त्या सुद्धा एकाच चित्रपटासाठी निभावणं  ही खरंतर तारेवरची कसरत म्हणावी पण प्रसादने या सगळ्या भूमिका एकदम चोख पार पाडल्या आहेत.कधी रिलीज होतोय 'सुशीला - सुजीत'?प्रसाद प्रत्येक सिनेमात काही न काही तरी वेगळा प्रयत्न करून प्रेक्षकांना मोहित करण्याचा प्रयत्न करत असतो त्यामुळेच आता प्रेक्षकांना 'सुशीला - सुजीत'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार याची उत्सुकता लागली आहे. एकाच चित्रपटात या अशा ५ भूमिका निभावणारा प्रसाद हा खरोखरच मराठीतला एक हरहुन्नरी कलाकार आहे असं म्हणणं नक्कीच वावगं ठरणार नाही. 'सुशीला - सुजीत' हा सिनेमा १८ एप्रिलला सिनेमागृहात बघायला मिळेल. 

टॅग्स :प्रसाद ओक सोनाली कुलकर्णीस्वप्निल जोशीमराठी अभिनेतामराठी चित्रपट