Join us

"ही खरी फायनल...", T20 वर्ल्ड कप जिंकताच मराठी अभिनेत्यानं केलं भारतीय संघाचं कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2024 10:18 IST

सध्या सर्व स्तरांवर भारतीय टीमचं कौतुक करण्यात येत आहे.

T20 वर्ल्डकपचा महिनाभरापासून सुरु असलेला थरार अखेर भारताच्या विजयाने संपला आहे. भारतीय संघाने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत एकही सामना न गमवता जेतेपदावर नाव कोरलं आहे.  सलग 8 सामने जिंकून भारताने चमकदार कामगिरी केली. जगभरातील लाखो क्रिकेटप्रेमींचं आणि भारतीय प्रेक्षकांचं लक्ष लागून राहिलं होतं. आता विजयानंतर सध्या सर्व स्तरांवर भारतीय टीमचं कौतुक करण्यात येत आहे. अभिनेता ऋषिकेश जोशी यांनी खास पोस्ट शेअर केली आहे. 

ऋषिकेश जोशीनं फेसबुकवर खास पोस्ट शेअर करत भारतीय संघाचं कौतुक केलं. तसेच अफ्रिका संघही चांगला खेळाल्याचं त्याने म्हटलं. त्याने लिहलं, 'ही खरी फायनल...वेल प्लेड आफ्रिका...हार्ड लक...जिंकाल तुम्ही पुढे कधीतरी'. ऋषिकेश जोशी यांच्या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत भारताच्या विजयाचं कौतुक केलं आहे. ऋषिकेश जोशी यांनी याआधीही  T20 वर्ल्डकपमधील भारताच्या कामगिरीवर पोस्ट केल्या होत्या. 

सामन्यात टॉस जिंकून भारतानं पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्यांदा फलंदाजी करताना भारतानं दक्षिण आफ्रिकेसमोर 177 धावांचं लक्ष्य ठेवलं. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या दक्षिण आफ्रिकेला निर्धारीत 20 षटकांमध्ये 169 धावाच बनवता आल्या, आणि हा महाबुकाबला भारतानं 7 धावानं जिंकला. भारतानं तब्बल 17 वर्षांनंतर टी20 वर्ल्ड कप जिंकलं. या विजयानंतर  खेळाडूंच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. प्रत्येक खेळाडू एकमेकांना मिठ्या मारून आपल्या अश्रूंना मोकळी वाट करून दिली. याचसोबत विराट कोहली आणि कर्णधार रोहित शर्मा यांनी टी20 मधून निवृत्तीची घोषणा केली आहे.  

टॅग्स :ट्वेंटी-20 वर्ल्ड कप 2024मराठी अभिनेतासेलिब्रिटीटी-20 क्रिकेटद. आफ्रिका