Join us

गणेश चतुर्थीच्या दिवशीच अभिनेत्याच्या घरी लक्ष्मीचं आगमन, पत्नीने दिला गोंडस मुलीला जन्म

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2025 13:48 IST

गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी मराठी अभिनेत्याच्या घरी लक्ष्मीचं आगमन झालं आहे. अभिनेत्याला कन्यारत्नाची प्राप्ती झाली आहे.

सगळीकडे गणेशोत्सवाचं मंगलमय वातावरण पाहायला मिळत आहे. अशातच मराठी अभिनेत्याने गुडन्यूज दिली आहे. गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी मराठी अभिनेत्याच्या घरी लक्ष्मीचं आगमन झालं आहे. अभिनेत्याला कन्यारत्नाची प्राप्ती झाली आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही गुडन्यूज त्याने शेअर केली आहे. 

गणेशोत्सवाचा पहिलाच दिवस अभिनेता आणि दिग्दर्शक असलेल्या सूरज परासनिससाठी खास ठरला आहे. २७ ऑगस्टला बुधवारी सूरजच्या लक्ष्मीच्या रुपात लेकीचं आगमन झालं आहे. गणपतीच्या पहिल्याच दिवशी अभिनेत्याच्या घरी पाळणा हलला. "आम्हाला हे सांगण्यास अत्यंत आनंद होतो आहे की गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी आम्हाला कन्यारत्नाची प्राप्ती झाली आहे", असं म्हणत सूरजने आनंद व्यक्त केला आहे. सेलिब्रिटी आणि चाहत्यांनी सूरजच्या पोस्टवर कमेंट करत त्याचं अभिनंदन केलं आहे. 

सूरज एक अभिनेता असण्यासोबतच दिग्दर्शक आणि लेखकही आहे. अनेक नाटकांमध्ये त्याने काम केलं आहे. राजकुमार रावच्या श्रीकांत सिनेमात तो छोट्याशा भूमिकेत दिसला होता. त्याची निर्मिती संस्थादेखील आहे. वरवरचे वधू वर या नाटकात तो सध्या काम करत आहे. तर मिकी, कोहम या नाटकाची त्याने निर्मिती केली आहे. एक तिची गोष्ट या नाटकाच्या दिग्दर्शनाची बाजू सूरज सांभाळत आहे. 

टॅग्स :टिव्ही कलाकार